पैठण,दिं.२०: पैठण तालुक्यातील खेर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी नऊ ग्रामपंचायत सदस्य पैकी सात सदस्य उपस्थित होते सदरील ग्रामपंचायत राज्याचे रोहयो तथा पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या ताब्यात आली आहे.
खेर्डा येथील सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंचपदी श्रीमती शिलाबाई नरहरी शिंदे तर उपसरपंचपदी शरद अंकुशराव शिंदे यांची बिनविरोध निवड गुरूवार (ता.२०) रोजी झाली.
औरंगाबादचे जिल्हाधिकारी व पैठण येथील तहसीलदार यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायत कार्यालय खेर्डा येथील सरपंच उपसरपंच पदाची निवड संदर्भात विशेष सभेचे आयोजन अध्यासी अधिकारी शशिकांत ठेंगे मंडळ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालय खेर्डा येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी यावेळी ग्रामविकास अधिकारी तथा पैठण तालुका ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष खंडू वीर तसेच ग्रामपंचायत सदस्य बेबीता लोखंडे, शिलाबाई मुळे, सोनाली शिंदे, कृष्णा शिंदे , कैलास जाधव, शंकर शिंदे, बाबासाहेब शिंदे ,श्याम शिंदे, विष्णू दांडगे, बप्पासाहेब दांडगे,तलाठी राजु साळवे, ताराचंद शिंदे, ग्रामपंचायत कर्मचारी विलास लोखंडे ,लक्ष्मण खंडागळे, गणेश शिंदे सह ग्रामस्थ,कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—————-
फोटो : पैठण : खेर्डा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिलाबाई शिंदे तर उपसरपंचपदी शरद शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी ग्रामविकास अधिकारी खंडू वीर सह आदी उपस्थित होते.(छायाचित्र : विनायक मोकासे)