पैठण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम उत्साहात दिन साजरा.

0

<p>पैठण,दिं.१७.: पैठण येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

   यावेळी सहाय्यक अभियंता श्रेणी १ इंजि राजेंद्र बोरकर  पाटील यांचा हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी बोलताना बोरकर यांनी सांगितले की भारतातील बलाढ्य निजामाला खिळखिळे करून सोडण्यासाठी मराठवाड्यातील जनतेने जीवाची पर्वा न करता घरदार सोडून भुमिगत लढा दिला त्यामुळे भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मराठवाड्यातील जनतेचा लढा पाहून लष्करी कारवाई करून १७ सप्टेंबर १९४८ ला मराठवाडा मुक्त करून हैदराबाद च्या निजामाला भारतात विलीन करून घेतले याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते तथा कै अॅड प्रदीप देशमुख मित्र मंडळाचे दिनेश पारीख यांनी सांगितले की मराठवाड्याचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वावर मराठवाड्याने काय मिळविले काय गमविले व काय मिळवायचे राहिले तसेच मराठवाड्यातील विविध क्षेत्रातील अनुशेष भरून काढण्यासाठी विशेष आयोगाची स्थापना करावी अशी मागणी केली.

  यावेळी सहाय्यक अभियंता श्रीमती एस के जनगावे, शाखा अभियंता बी आर  चौंडिये,एल जी तनपुरे,जी एस म्हस्के, गणेश यादव,डी एस तारो, मारोती ईधाटे, वरिष्ठ लिपिक भारत लांडगे, कनिष्ठ लिपिक बी एस केदार,एम एस बिल्डा,इब्राहीम खान पठाण सह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here