पैठण,दिं.११.(प्रतिनिधी ):पैठण तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीनेअनेक वर्षांपासून मागणी जोर धरून होती .या मागणीला यश आले असून पैठण शहरात लवकरच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भव्य दिव्य स्मारक उभारण्यासाठी जागा निश्चित करून कामाला सुरुवात केली जाईल तसेच तालुक्यातील राहिलेल्या गावात खंडोबा मंदिर आणि बिरोबा मंदिरासमोर सभामंडप येणाऱ्या काळात देणार असल्याचे बुधवार रोजी राज्याचे रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण तालुक्यातील धनगर समाजाच्या शिष्टमंडळाच्या बैठकीदरम्यान म्हणाले .
बुधवार रोजी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदिपान पाटील भुमरे यांची पैठण तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले .धनगर समाजाच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा झाली . समाजांच्या भावनांची दखल घेवुन पैठण शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी च्या स्मारकासाठि तात्काळ पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी पैठण नगर परिषदेचे मुख्खाधिकारी संतोष आगळे यांना बोलावून शहरात जागा निश्चित करण्याचे आदेश दिले असून जागा निश्चित होताच कामाला लवकरच सुरुवात होईल असे आश्वासन यावेळी दिले .
यावेळी पैठण तालुक्यातील विविध पदाधिकारी माजी जिप सदस्य, पंस सदस्य ,सरपंच , उपसरपंच , ग्रापं सदस्य , चेअरमन,संचालक सह मोठ्या प्रमाणावर समाज बांधव उपस्थित होते .
—–
प्रतिक्रिया
संदीपान भुमरे [ पालकमंत्री ]धनगर समाजाची अनेक वर्षांपासूनची स्मारकाची मागणी होती .आज या संदर्भात मुख्याधिकारी यांना जागा निश्चित करण्याचे सांगितले असून निश्चित झाल्यानंतर भव्यदिव्य स्मारक बनवले जाईल .
———
राजेंद्र वाघमोडे [चेअरमन] अनेक वर्षापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक शहरात व्हावे ही समाजाची मागणी होती . पालकमंत्री संदिपान भुमरे साहेब यांनी ही मागणीमंजूर केली आहे . साहेबांच्या माध्यमातून आहिल्यादेवीचे भव्य दिव्य स्मारक पैठण शहरात येणाऱ्या काळात बनणार आहे .