पोलिस उपमहानिरीक्षक शेखर यांच्या समोर आघाव कुटुंबियांनी संताप व्यक्त केला.
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
पो.हे.काँ. भाऊसाहेब आघाव यांच्या आत्महत्येत जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी जबाबदार आहेत. पोलिस अधिक्षक मनोज पाटील, शिस्तभंग विषयक प्राधिकारी तथा पोलीस उपअधिक्षक अजित पाटील,कार्यालयीन अधिक्षक कुसकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपहानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्याकडे निवेदनद्वारे आघाव कुटुंबियांनी केली आहे.शेखर यांच्या समोर आघाव कुटुंबियांनी संताप व्यक्त केला. दरम्यान या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी केली जाईल. दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे आश्वासन शेखर यांनी आघाव कुटुंबियांना दिले.
मृत भाऊसाहेब आघाव यांच्या पत्नी रंजना आघाव, मुलगी तेजस्वीनी व मुलगा प्रेमकुमार, यमाजी आघाव, भिवाजी आघाव, डॉ. ज्ञानेश्वर आघाव, सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वास पवार, राजू नागरे, किशोर कोहकडे, बाळासाहेब घुले, बाळासाहेब गाडे, सुकुमार पवार, शरद गिते यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयामध्ये नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपहानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांची भेट घेतली.यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर विभागिय पोलिस अधिकारी संदिप मिटके, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे आदी उपस्थित होते.मृत आघाव निर्दोष असतानाही पोलिस प्रशासनाने चुकीच्या पद्धतीने षडयंत्र रचले. उच्च न्यायालयाने कारवाई करण्यास मनाई केली असतानाही जिल्हा पोलिस अधीक्षक पाटील यांनी आदेश कसे काढले. सुसाईड नोट सापडली असतानाही त्याची माहिती उशिराने दिली. गुन्हा दाखल करण्यासाठी सायंकाळ का केली? सुसाईड नोटमध्ये आरोपी पोलिस विभागातच कार्यरत असतानाही त्यांना ताब्यात का घेतले नाही? लिपीक फुंदे हे घटनेच्या दिवशी रात्री जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात बसून होते, त्यांना अटक का केली नाही? अशा अनेक प्रश्नाचा भडीमार आघाव कुटुंबियांनी शेखर यांच्यासमोर उपस्थित केले.
चौकट
आ.तनपुरे यांनी पोलिस प्रशासनास धारेवर धरले.
आ. तनपुरे यांनीही पोलिस प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. पोलिस प्रशासनाने खोटा गुन्हा दाखल करून अडकविणाऱ्यांना संरक्षण दिले तर गुन्हेगार नसतानाही आघाव यांना शिक्षा देण्याचा प्लॅन कोणी रचला? आघाव यांचा छळ करण्यामध्ये कोण कोण आहेत? जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करून मयत आघाव यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, अशी मागणी करताना आरोपी अटक झाली पाहिजे.नाहीतर गाठ माझ्याशी आहे असा इशारा आ. तनपुरे यांनी दिला. जिल्हा पोलिसांनी मृत आघावा यांचा छळ करत त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आघाव कुटुंबियांनी केला. आ. प्राजक्त तनपुरे यांनीही आघाव कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली. आघाव यांच्या बाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला जाईल असे आ.तनपुरे यांनी सांगितले.
चौकट
चौकशीसाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार;शेखर
पोलिस प्रशासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेतलेली असून जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केल्याशिवाय राहणार नाही. लिपीक शिवाजी फुंदे यास निलंबित केले आहे. सर्व आरोपींना लवकरच गजाआड करू. आघाव कुटुंबियांच्या संमतीनेच प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची समिती गठीत करणार.
डॉ. बी. जी. शेखर, पोलीस
उपहामनिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र
चौकट
विभागिय चौकशीच चुकीची पुराव्यासह मांडले
निवृत्त पोलिस हवालदार एन.बी. लोंढे यांनी बी. जी. शेखर पाटील यांच्यापुढे आघाव प्रकरणामध्ये विभागिय चौकशीतही चुकीचे निर्णय कशा प्रकारे हलगर्जीपणा करीत कोणताही दोष नसताना विभागिय चौकशीमध्ये चुकीच्या पद्धतीने कारवाई केली, हे पुराव्यासह शेखर यांच्या समोर मांडले
चौकट
पोलिस अधिक्षक कार्यालयातील ते तीन अधिकारी आत्महत्येस जबाबदार,10 आँक्टोबरला रास्तारोको
पोलिस अधिक्षक मनोज पाटील हे सुद्धा माझ्या वडीलांच्या आत्महत्येस जबाबदार आहेत. पो.हे.काँ. आघाव यांचा मुलगा मुलगा प्रेम आघाव व कुटुंबियांनी बी. जी. शेखर पाटील यांना दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे.आघाव यांना खोट्या गुन्ह्यात अडकविल्यानंतर चौकशी अधिकाऱ्यांनी कशापद्धतीने छळ केला. याबाबतची निवेदनाद्वारे कैफीयत मांडली. जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, उपविभागिय पोलिस अधिकारी अजित पाटील, कार्यालयीन अधिक्षक कुसकर या तिनही अधिकाऱ्यांचे नावे आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या फिर्यादीत समाविष्ट करावे.दाखल असलेल्या गुन्ह्यातील चारही आरोपींना तातडीने अटक करावी. अन्यथा 10 आँक्टोबर रोजी नगर मनमाड रस्त्यावर रास्तारोको आंदोलन करणार असल्याचा इशारा मयत आघाव यांचा मुलगा प्रेम आघाव यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
चौकट
चौकशी अधिकाऱ्यांनी मँट न्यायालयाचा अवमान केला
मृत आघाव यांचे सहकारी निवृत्त पोलिस हवालदार एन.बी. लोंढे यांच्यासह अँड. विश्वास वाघ, यांच्या मार्फत मॅट न्यायालयात औरंगाबाद ३६१/२०२२ नुसार विभागीय चौकशीमध्ये अव्हान याचिका दाखल केली होती. सध्या न्याय प्रविष्ठ आहे. सदर याचिके अन्वये, मॅट न्यायालयाने आघाव यांची बाजू ऐकून घेवून सदर विभागीय चौकशीमध्ये पोलिस अधिक्षक व चौकशी अधिकारी शपथ पत्रासह आपले म्हणणे जोपर्यंत मॅट मध्ये दाखल करीत नाहीत तो पर्यंत सदर विभागीय चौकशीमध्ये कोणतीही कार्यवाही करण्यात येऊ नये.असा आदेश मॅट न्यायालयाने दिला होता.२५ आँगस्ट २०२२ रोजीच्या मॅट न्यायालयाने ‘स्थगिती’ ऑर्डर दिलेला असतांना देखील त्या ‘स्थगिती’ ऑर्डरला तथा न्यायालयास न जुमानता जणु काही प्रचलित नियम कायदयापेक्षा मॅट न्यायालयापेक्षा सर्वश्रेष्ठ आहोत असे समजून पोलिस अधिक्षक मनोज पाटील, विभागीय चौकशी अधिकारी तथा उपविभागीय पोलीस अधिकारी नगर ग्रामीण अजित पाटील,कार्यालयीन अधिक्षक कुसकर,प्रमुख विभागीय चौकशी लिपिक शिवाजी फुंदे,आदींनी संगनमत करुन विभागीय चौकशी चालवून कारणे दाखवा नोटीस सोबत प्रस्तावित शिक्षा आदेश बजाविता येत नसतांना देखील त्यांनी आघाव यांना सेवेतून कमी का करण्यात येऊ नये? अशा आशयाचा प्रस्तावित शिक्षा आदेश आणि त्या सोबत कारणेदाखवा नोटीस बजावली होती.विभागिय चौकशीला स्थगिती आदेश असताना मँट न्यायालयाचा अवमान केला आहे.