पैठण,दिं.२५ : एस आय डी सी पैठण पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दिलीप चौरे यांना पोलीस दलात उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याबद्दल त्यांचा क्रिस्टल केमिकल कंपनीच्या वतीने कंपनीचे व्यवस्थापक आबासाहेब पाटील गिरगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शालीनी केमिकल कंपनीचे व्यवस्थापक रामेश्वर सुरासे पाटील,हभप लक्ष्मण महाराज चौरे सह आदी उपस्थित होते.
या सत्कार प्रसंगी बोलताना पोलिस उपनिरीक्षक चौरे यांनी सांगितले की, मी पोलीस सेवेमध्ये ३४ वर्ष उल्लेखनीय कामगिरी करत आपले कर्तव्य बजावले असून पोलीस ठाणे करमाड, चिकलठाणा ,बिडकीन, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा येथे सेवा केलेली असून आता पर्यंत मला उत्कृष्ट कामाबद्दल ३५० बक्षीस, दहा प्रशस्तीपत्रके व पाच प्रशंसा पत्रके मिळालेली आहेत. गंभीर गुन्ह्याचे तपासाचे कागदपत्र तयार करून आतापर्यंत वीस गुन्ह्यात आरोपींना दहा वर्ष, पाच वर्ष व जन्मठेपेच्या शिक्षा मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे.कार्यक्रमास एम आय डी सी पैठण येथील कामगार, ग्रामस्थ उपस्थित होते.
————
फोटो : पैठण : एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिलीप चौरे यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाल्याने त्याचा सत्कार आबासाहेब गिरगे पाटील यांनी केला यावेळी हभप लक्ष्मण चौरे महाराज उपस्थित होते. (छायाचित्र : विनायक मोकासे, पैठण)
——–