प्रजापती म्यागनम वसाहतीत गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा.

0

उरण दि १०(विठ्ठल ममताबादे )

माघ शुक्ल पक्षात गणेश जयंती चा सर्व महाराष्ट्रात उत्सव साजरा होतो . बाप्पाच्या आगमनाचा सोहळा अगदी विलोभनीय असतो. अशाच प्रकारे प्रजापती म्याग्नम , द्रोणागिरी, उरण येथील वसाहतीत प्रथमच बाप्पाचे आगमन झाले . सांस्कृतिक कार्यक्रम समितीचे सदस्य  पूजा नारकर,  मीना दास, रिद्धी पारेख, वर्षा कुडाव, तृप्ती सुतार, अरुण तायडे, संतोष मिश्रा यांच्या अथक परिश्रमाने आगमनाची पूर्व तयारी व त्यानंतर आयोजित सप्तरंगी कार्यक्रमाची रूपरेषा,बाप्पाची स्थापना, सत्यनारायण पूजा, आरती,भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, महाप्रसाद, जागरण, विसर्जन असे कार्यक्रम मोठया उत्साहात संपन्न झाले.

यावेळी उत्तम रोषणाई व साउंड सिस्टीम होती.लोकमान्य टिळकांनी इंग्रज्यांच्या काळात जागरूकता आणि एकता या उद्देशाने गणपती उत्सवाची निर्मिती केली. तो उद्देश या वसाहतीत साध्य केला गेला . वसाहतीतील सर्व जणांनी एकत्र येत एकजुटीने मदतीचा हाथ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. बाल आणि युवा पिढी, महिला आणि पुरुष यांच्या विविध कला गुणांच्या छटांनी रंगमंच बहरला  होता.

बाप्पाच्या आगमनाचा सोहळ्यात सर्व रहिवाश्यांनी  धार्मिकतेच्या वातावरणात कार्यक्रमांचा आनंद घेतला. ढोल ताश्याच्या गजरात बाप्पाचा निरोप  घेताना सर्वांचे मन गहिवरले होते. पुढच्या वर्षी लवकर या गजरात बाप्पाचे विसर्जन करण्यात आले.एकंदरीत उरण तालुक्यातील द्रोणागिरी शहरातील प्रजापती म्यॅगनम वसाहती मध्ये गणेशोत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here