प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे : महेंद्रशेठ घरत

0

उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )पृथ्वीवरील तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, निरोगी जीवन जगण्यासाठी वृक्ष लागवडीची अत्यंत गरज आहे . प्रत्येकाने किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत यांनी केले.

मोहोपाडा येथील जनता विद्यालयाच्या भव्य  प्रांगणात सुरू असलेल्या वारकरी सांप्रदायिक प्रसारक मंडळ रसायनी,खालापुर परिसरात आयोजित केलेल्या श्री तुकाराम गाथा पारायण अखंड हरिनाम सप्ताहातील दीपोत्सव कार्यक्रमाप्रसंगी गुरुवारी (१२ डिसेंबर रोजी) केले.यावेळी पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करण्याचा प्रत्येकाने निश्चय केला पाहिजे असेही त्यांनी सांगितले. दानशूर व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे महेंद्रशेठ घरत यांनी सांप्रदाय मंडळाला ५१ हजार रुपयांची देणगी दिली.

   

  यावेळी माजी सरपंच तथा तालुका अध्यक्ष कृष्णा पारंगे, रायगड जिल्हा काँग्रेस युवक अध्यक्ष निखिल डवले,माजी सभापती कांचनताई पारंगे, देविदास म्हात्रे तसेच सांप्रदाय मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here