प्रियदर्शनी महिला मंडळ आयोजित

0

“जागर स्त्री शक्तीचा” नवरात्रौत्सव स्पर्धेतील महिलांना

आ. आशुतोष काळेंच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न

कोळपेवाडी वार्ताहर – प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या वतीने मंडळाच्या वतीने यावर्षी नवरात्र उत्सव निमित्त ‘जागर स्त्री शक्तीचा’कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून या नवरात्र उत्सवात घेण्यात आलेल्या वविध स्पर्धेच्या विजेत्यांना मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या उपस्थितीत आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी सौ. चैतालीताई काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे.

प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळ मागील अनेक वर्षापासून महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचत गटाची चळवळ उभी करून बचत गटाच्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन करीत असते. त्याचबरोबर महिला भगिनींच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून विविध स्पर्धाचे आयोजन करीत असते. दोन वर्ष जीवघेण्या कोरोना महामारीमुळे सावट असल्यामुळे साजरा करण्यात आलेल्या नवरात्र उत्सवात ज्या महिलांना सहभागी होता आले नाही अशा सर्व महिलांसह कोपरगाव शहरातील व तालुक्यातील महिला भगिनींनी या सर्वच स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला व महिलांचा सर्वात आवडता असणारा “होम मिनिस्टर” कार्यक्रम तर महिलांच्या आग्रहास्तव दोनदा घ्यावा लागला एवढा मोठा प्रतिसाद या सर्व स्पर्धांना मिळाला. स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे.

होम मिनिस्टर मानाची पैठणी प्रथम विजेत्या सौ. कल्पना वाघमारे, द्वितीय सौ.वैशाली डोखे यांनी तर तृतीय मानकरी  सौ.शितल पहेलवान ठरल्या. सौ.रोहिणी त्रिभुवन, सौ.प्रतिभा गायकवाड, सौ.शितल निकम, सौ.पल्लवी मोरे, सौ.रेखा जाधव, सौ.आरती गायकवाड, सौ.मोनिका मोरे व सौ.आशा शार्दूल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात देण्यात आले. मेहंदी स्पर्धा प्रथम प्रथम कु. रीबिका जाधव, द्वितीय कु.निशा सरोदे, तृतीय सुश्मिता पाईक, चतुर्थ आरती शिंदे उत्तेजनार्थ सौ.दुर्गा जाधव, केक डेकोरेशन पूजा नरोडे, उखाणे स्पर्धा प्रथम सुनिता भावसार, द्वितीय जयश्री हिवाळे,तृतीय अनिता मुन्शी, चतुर्थ सुनिता मुसळे उत्तेजनार्थ मनीषा येवले, पूजा थाळी स्पर्धा प्रथम स्नेहल घोरपडे, द्वितीय शैला नवलपुरे, तृतीय योगिता जाधव, चतुर्थ माया हलवाई, उत्तेजनार्थ सुचिता वर्मा, देवी तिलक स्पर्धा प्रथम पल्लवी पोटे, द्वितीय भक्ती लाड, तृतीय अर्चना औताडे, उत्तेजनार्थ मनिषा मराठे व सुचिता वर्मा, पाक कला स्पर्धा प्रथम नीता अजमेरे, द्वितीय सपना जाधव, तृतीय पद्मा गोंजारे, चतुर्थ सुवर्णा राठी, उत्तेजनार्थ जुही तपसे, मंजुषा सारंगधर, गव्हाच्या पिठापासून तयार केलेले देवीचे अलंकार स्पर्धा प्रथम जयश्री हिवाळे, द्वितीय स्नेहल घोरपडे, तृतीय पूनम वाणी, चतुर्थ भक्ती लाड, डान्स स्पर्धा लहान गट प्रथम दिया दारूवाला, द्वितीय पलक बोधक, तृतीय थ्री लिटल स्टार, मधला गट प्रथम निधी आदमाने, द्वितीय ईशा गंगुले, तृतीय सायली घोडेराव मोठा गट प्रथम आर. क्रेव ग्रुप, द्वितीय ज्या माता दि ग्रुप, तृतीय डी डान्स ग्रुप, रांगोळी स्पर्धा प्रथम कु.प्राजक्ता राजेभोसले, द्वितीय साई भगत, तृतीय कु. निकिता कोतकर, चतुर्थ कु.रिनल कोडेकर उत्तेजनार्थ कु.अंजली शार्दुल आदी महिला बक्षिसाच्या मानकरी ठरल्या. सर्व बक्षीस विजेत्या महिलांचे व स्पर्धेत भाग घेतलेल्या महिलांचे मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे यांच्या उपस्थितीत आ. आशुतोष काळे व त्यांच्या पत्नी सौ. चैतालीताई काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी मिमिक्री आर्टिस्ट संदीप जाधव व सुधीर कोयटे यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची शोभा आणखी वाढली.यावेळी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

फोटो ओळ- जागर स्त्री शक्तीचा’कार्यक्रमात आयोजित स्पर्धेतील विजेत्या महिलांना बक्षीस वितरण करतांना आमदार आशुतोष काळे समवेत मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई काळे व सौ. चैतालीताई काळे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here