फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रूक मध्ये अवैध धंदे फोफावले 

0

फलटण ग्रामीण / समीर पठाण

फलटण तालुक्यातील पुर्व भागात दारु पिऊन रस्त्यावर पडणे ,अवेच्च भाषेत शिवीगाळ करणे असे काहीसे प्रकार कुरवली बुद्रूक मध्ये घडताना दिसत आहे. यांचा अर्थ पुर्व भागात दारु विक्री करणारे यांना पोलीस लोकांचा वचक राहिलेला नाही असे चिन्हं स्पष्ट दिसत आहे. दारु विक्री करणारे जोमात अवैध धंदे करत असुन कोणी यावर लक्ष्य देणार का ? महिला वर्ग दिवस रात्र कष्ट करून पैसे कमावतात . हे लोक महिलांना दमदाटी करून पैसे घेऊन दारू पिऊन मज्जा मारतात. कुरवली बुद्रूक हे गाव फलटण तालुक्यातील छोटंस गाव असुन, अशिक्षित महिला , पोलीस स्टेशन विषयी असणारी भिती , या सर्व कारणांमुळे कोणीही पुढे येऊन तक्रार करत नाही. समजा कोणी  तक्रार केली तर दारू विक्री करणारे त्या व्यक्तीवर दबाव टाकता . त्यांचे मानसिक खच्चीकरण करतात. व नंतर तो व्यक्ती तक्रार करायचे बंद करतात असी काहीसी परिस्थिती निर्माण झाली आहे .वरील फोटो मध्ये दारू पिऊन पडलेला व्यक्ती  दिसत असुन कोणी यावर लक्ष्य देणार का?

तरी बरड ग्रामीण पोलीस स्टेशन व वरिष्ठ अधिकारी यांनी दारु विक्री करणारे यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. व पोलीसांच्या खाकीचा वचक दाखवण्याची काहीसी परिस्थिती निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here