फलटण येथील  चिंतामणी पतसंस्था गैरव्यवहार प्रकरणी आणखी सहा संचालकांना अटक.

0

फलटण प्रतिनिधी

                     श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या.कोळकी, फलटण पतसंस्थेमध्ये एकुण २४,०१,६०,७६९/- रुपये रकमेचा अपहार प्रकरणीआर्थिक गुन्हेशाखा सातारा यांनी  धडाकेबाज कारवाई करत आणखी सहा संचालकांना अटक केली आहे.आतापर्यंत एकूण नऊ जणांना अटक झाली आहे.सदरची कारवाई  आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधीक्षक मोहन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदरचे आरोपी शोधण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी भोसले यांची भुमिका ठरली महत्वाची.ठरली आहे. 

                 श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ ग्रामीण बिगरशेती सह. पतसंस्था मर्या., कोळकी, फलटण जि. सातारा पतसंस्थे मार्फत अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक आणि व्यवस्थापक यांनी पतसंस्थेच्या ठेवीदारांकडून प्राप्त ठेवींच्या रकमांचा अपहार करून ठेवीदारांची  रुपयेची आर्थिक फसवणूक केलेबाबत जानेवारी २०१९ मध्ये फलटण शहर पोलीस ठाणे  येथे सदर प्रकरणी २ गुन्हे दाखल असून सदर गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. त्यासाठी ठेवी धारकांनी फलटण येथे साखळी उपोषण केले होते.सदर गुन्ह्यातील आरोपी नामे १) प्रदीप बापुचंद गांधी, वय ६५ वर्षे रा. पुणे पंढरपुर रोड रानडे पेट्रोल पंपा शेजारी, फलटण २) धनेश नवलचंद शहा, वय ५७ वर्षे, रा. २१७ शुक्रवार पेठ, फलटण ३) भूषण कांतीलाल दोशी, वय ६५ वर्षे रा. २४८ शुक्रवार पेठ, फलटण ४) नाना खंडू लांडगे, वय ५५ वर्षे, रा. मौजे निभोरे ५) लाला तुकाराम मोहिते, ५२ वर्षे, रा. मौजे खुंटे ६) अजय अरविंद शहा, वय ५५ वर्षे, रा. मोती चौक, रविवार पेठ, फलटण (सर्व रा. ता. फलटण जि. सातारा) हे मागील ३ वर्षांपासून गुन्ह्यांमध्ये तपासकामी पाहिजे होते.तत्पूर्वी त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज 22 ऑक्टोबर 22  रोजी फेटाळला आहे. त्यानंतर त्यांनी संस्थेचे अध्यक्ष नितीन कोठारी, व्यवस्थापक माधव आदलिंगे आणि संचालक  जावेद पापा भाई मणेर  यांना 28 ऑक्टोबर रोजी सातारा येथे ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी सदर आरोपी फलटण येथे येणार असल्याची खबर  मिळाल्याने सदर ठिकाणी सापळा लावून कारवाई करणे कामी  मोहन शिंदे, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांनी गुन्ह्याचे तपासी अधिकारी शिवाजी भोसले, सहा. पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी फलटण शहर व आजूबाजूचे परिसरामध्ये आरोपींचा शोध घेऊन आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यामधील सहभाग निष्पन्न झालेने नमुद गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

                           सदर कारवाईमध्ये  समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व  बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली व  मोहन शिंदे, पोलीस उप-अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी भोसले, सहा. पोलीस निरीक्षक, सहा.पो.फौ. प्रमोद नलावडे, पो.ना. ६९९ मनोज जाधव, पो.ना. २०३७ संतोष राऊत, पो. कॉ. ६६४ शफिक शेख, पो. कॉ. ६६८ प्रसाद जाधव यांनी सहभाग घेतला असून सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here