कोपरगांव :- दि. ४ ऑक्टोंबर २०२२ –
तालुक्यातील बक्तरपुर व मोर्विस ग्रामपंचायत अंतर्गत सुमारे ४० लाख रूपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भुमिपुजने व लोकार्पण कार्यक्रम भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यांत आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रामपंचायत अंतर्गत विकासाचा पाया अधिक मजबुत होण्यांसाठी थेट वित्त आयोगामार्फत निधी पुरविल्यांने त्यातुन जनविकास होत असल्याचे प्रतिपादन सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी यावेळी बोलतांना केले.
प्रारंभी बक्तरपुरचे सरपंच संजय बोडखे यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, तत्कालीन आमदार सौ स्नेहलताताई कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी गांवच्या विकासात दिलेल्या योगदानाची माहिती दिली. दिनेश सानप यांनी प्रास्तविक केले. मोर्विसचे सरपंच एकनाथ माळी यांनी दहा लाख रूपये खर्चाचे सामाजिक सभागृह, पाणीपुरवठा योजना, पारखे वस्ती शाळेचे सुरक्षा कम्पाउंडचे लोकार्पण तर राजेंद्र चोपडे ते वाल्मीक कोकाटे रस्ता खडीकरणाचे भुमिपुजन यासह अन्य विकास कामांची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता या अभियानाअंतर्गत मोफत मोतिबिंदु शस्त्रकिया केलेल्या रूग्णांना चष्म्यांचे वितरण करण्यांत आले.
सौ. स्नेहलताताई कोल्हे पुढे म्हणाल्या की, कोरोना महामारीनंतर प्रथमच नवरात्र महोत्सव जाहिरपणे साजरा होवुन त्यात सर्वांनाच सहभागी होता आले. ग्रामिण भागातल्या नवदुर्गा हया तुम्हा आम्हा सर्वांच्या उदबोधक असुन गांवच्या विकासात काय कमी आहे आणि त्यासाठी नेमकेपणाने काय केले पाहिजे याची शिकवण मिळत असते. शासकीय योजना अनंत आहे त्याचा लाभ तळागाळातील थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्यांसाठी आपण सदैव कार्यरत असतो.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे संचालक मनेष गाडे, विलास माळी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष संभाजी गावंड, मुक्ताबाई नागरे, विजय गाडे, शिवाजी घुमरे, विजय साळुंके, माधव गोसावी, बाळासाहेब सानप, बच्छाव सानप, अशोक सानप, माधव बोडखे, सुभाष कांगणे, विश्वनाथ बारगळ, बाजीराव सानप, दौलत सोनवणे, संदिप बारगळ, जनार्दन कांगणे, चेतन बोडखे, गणेश नागरे, के के सानप, गोवर्धन सानप, संजय सानप, दिनेश सानप, संतोष सानप, उध्दव बोडखे, अरूण उगले, मोर्विसचे उपसरपंच अशोक पारखे, गोरख कोकाटे, नामेदव कोकाटे, ग्रामपंचायत सदस्या सुनिता माळी, संतोष सरडे, प्रभाकर पारखे, सोमनाथ पारखे, अनिल साबळे, रमेश शेपाळ, हरिभाउ सरडे, बाळासाहेब अहिरे, संपतराव कोकाटे, माधव कोकाटे, यादव कोकाटे, गोरखनाथ पारखे, सुनिल सरडे, संतोष सरडे, ज्ञानेश्वर सरडे, रामनाथ तासकर, तुषार वाघ, राजेंद्र पारखे, प्रकाश कोकाटे, विष्णु कोकाटे, अभिजित चोपडे, मच्छिंद्र कोकाटे, रविंद्र सरडे, शिवराम कोकाटे, पारखेताई, मनिषा कोकाटे, सुमन कोकाटे, मनकर्णीका वैद्य, अनिता चोपडे यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, बक्तरपुर, मोर्विस पंचकोशीत नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते शेवटी गोरख कोकाटे यांनी आभार मानले.