सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातून मुक मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देऊन निषेध.
देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू समाजावर तेथील अन्याय अत्याचार सुरू असल्याने सदरील अन्य अत्याचार त्वरित थांबवावे यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीने महिला भगिनींच्या हस्ते राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देण्यात आले. मंगळवार दिनांक 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता राहुरी शहरातील खरेदी-विक्री संघासमोर सकल हिंदू बांधव जमा होऊन तेथून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली सदर मूक मोर्चा नगर मनमाड महामार्गाने राहुरी शहरातील नवी पेठ प्रगती शाळा जुनी पेठ तसेच शुक्लेश्वर चौक, शिवाजी चौक शनी चौक या मार्गे तहसील कार्यालयावर जमा झाला. या ठिकाणी ह भ प अर्जुन महाराज तनपुरे व ह भ प आदिनाथ महाराज दुशिंग यांनी भाषण केले.
बांगलादेश मध्ये संन्यासी चिन्मय कृष्णदास यांनी अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध केला म्हणून त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला टाकून त्यांना अटक करण्यात आलेली आहे . बांगलादेशमध्ये 4 ते 20 ऑक्टोबर दरम्यान पन्नास जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजारहून अधिक जातीय हल्ले झालेत यामध्ये हिंदू घरे, हिंदू समाजाचे व्यवसाय आणि हिंदू समाजाची मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे दरम्यानच्या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उध्वस्त केले जात आहे. हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आले आहेत , हिंदू महिलांवर सामूहिक बलात्कार झाल्याच्या घटना पुढे आल्या आहेत बांगलादेशमध्ये काही ठिकाणी हिंदूंचा अत्याचार होत . याबाबत संपूर्ण जगभरातील मानव अधिकार संस्थांनी चिंता व्यक्त करून येणाऱ्या काळात हे अत्याचार थांबविते अशी मागणी केली आहे
भारतीय राज्य शासनाला आमच्या भावना पोहोचू इच्छितो की बांगलादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचार थांबविण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य अशी भूमिका घेऊन अल्पसंख्यांक हिंदू हिताचे योग्य ते पाऊल उचलावे असे निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू हिंदू बांधवांच्या सह्या आहेत.या मूक मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाजातील महिला भगिनी व बांधवांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी सूत्रसंचालन प्रसाद बानकर यांनी केले.