गोंदवले-सातारा : जिल्हा परिषदेची माण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दरावस्ती (टाकेवाडी) या शाळेचा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रम अंतर्गत बालनाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा स्तरावर निवड झाली आहे.या बालनाट्य स्पर्धेत रुपांशु फासे,साईश फासे, समर्थ सावंत,साई पिसे, श्रीराम ढालपे,यश काशिद,शिवम शिंदे,आदीत्य उगलमोगले व विराज उगलमोगले या विद्यार्थ्यांनी छान सादरीकरण केले. छोट्या दुर्गम भागातील शाळेने उज्ज्वल यश संपादन केले…… नेहमीच नवनवीन उपक्रम राबवणारी अतिदुर्गम भागातील ही शाळा आहे.या मुलांना नवोपक्रमशील शिक्षिका सौ.भारती ओंबासे व मुख्याध्यापक श्री.अशोक गोरे यांचे मार्गदर्शन लाभले.या यशाबद्दल माण तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. माणिक राऊत साहेब, विस्ताराधिकारी मा. श्री. रमेश गंबरे साहेब, मा. श्री. लक्ष्मण पिसे साहेब, मा. श्रीम.सोनाली विभूते मॅडम,केंद्रप्रमुख मा.श्री.अशोक गंबरे साहेब,मा. श्री. नारायण आवळे साहेब,मा.श्री.अंकुश शिंदे साहेब,मा. श्री. बाळासाहेब पवार साहेब,टाकेवाडी गावचे सरपंच श्री.निलेश दडस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.संजय दडस मुख्याध्यापक मा. श्री.अशोक गोरे तसेच माणदेशातील स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित असंख्य शिक्षक बंधू भगिनींनी व सर्व पालकांनी दरावस्ती शाळेच्या या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.