बीआरएस पक्ष तेलंगणामध्ये सत्तेतून बाहेर तर कॉग्रेस पक्ष ठरला किंगमेकर 

0

सुदाम गाडेकर जालना :

 जालना  बीआरएस ला आपल राज्य सोडून महाराष्ट्रात पाया रोवताना  तेलंगणात प्रभाव स्वीकारावा लागला . कारण महाराष्ट्रात सर्व मंत्रिमंडळ सह सभा घेतल्याने वेळ वाया गेल्यामुळे प्रभाव झाल्याचं लोकांनाकडून बोललं जातं आहे. आजच्या  3 डिसेंबर च्या निकालावरून , ६७ जागांवर काँग्रेसने आघाडी घेतलेली आहे.  तर कॉग्रेस पक्षाला तेलंगणात सर्वात  जास्त जागा मिळाल्याने तेलंगणात कॉग्रेस  पक्ष किंगमेकर ठरला आहे. तर बीआरएस ३४ जांगावर आघाडीवर आहे. भाजपा १३ जागांवर तर एमआयएम ४ जागांवर सध्या आघाडीवर आहे.

तेलंगणाची स्थापना २०१३मध्ये झाली. त्यानंतरची ही तिसरी निवडणूक आहे. या निवडणुकीत केसीआर मुख्यमंत्री म्हणून हॅट्ट्रिक करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. केसीआर यांच्या पराभवामागे त्यांचा राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल असल्याचे मानले जाते. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड विजय मिळवल्यानंतर केसीआर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीबद्दल बोलले होते. २०२४च्या निवडणुकीपूर्वीही ते याच फॉर्म्युल्याखाली विरोधी आघाडी भारतामध्ये सामील झाले नाहीत. ऑक्टोबर २०२२मध्ये, KCR यांनी राष्ट्रीय मंचावर आणण्यासाठी त्यांच्या पक्षाचे नाव TRS (तेलंगणा राष्ट्र समिती) बदलून BRS (भारत राष्ट्र समिती) केले.

इतकेच नाही तर तेलंगणाच्या निवडणुकीला वर्षभराहून कमी कालावधी शिल्लक होतं. त्यावेळी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेस-भाजपा राज्यात केसीआरच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यात व्यस्त असताना केसीआर ७०० वाहनांच्या ताफ्यासह तेलंगणासोडून महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं. यामध्ये संपूर्ण तेलंगणाचं मंत्रिमंडळही त्यांच्यासोबत होते. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल आणि तेलंगणासोडून इतर राज्यात घालवलेला वेळ केसीआर यांना महागात पडल्याचं निकालावरुन स्पष्ट होत आहे. त्यांना आता पराभव कशामुळे झाला चिंतन करून सुधारण्याची गरज आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here