बुलडाणा जिल्हा एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेची कार्यकारणी निवड जाहीर

0

बुलडाणा, (प्रतिनिधी)- बुलडाणा जिल्हा एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेची विभागीय कार्यकारणीची बैठक संपन्न जिल्हाध्यक्षपदी दिपक मिसाळकर, जिल्हासचिव भारत आराख, कार्यध्यक्ष जिवन जाधव, कोषाध्यक्ष जितेंद्र साळवे तर विधीसल्लागार पदी बाबासाहेब जाधव तर महीला आघाडीध्यक्षपदी लक्ष्मीताई बंड यांची लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली

केंद्रीय मागासवर्गीय आयोगाची एकमेव मान्यता प्राप्त संघटना मिळालेली व असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात मागासवर्गीय एससी,एसटी, ओबीसी कर्मचाऱ्यासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी सन १९८० पासून सविधानीक मार्गाने झटनारी व न्याय मिळवून देणारी एकमेव संघटना म्हणजे एसटी कास्ट्राईब  “संघर्ष हामारा जन्मसिध्द हक्क आहे तो मिळवल्या शिवाय राहणार नाही “ या डॅा. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार सरणीवर चालनारी एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटना आहे . आशा या एसटी कर्मचारी संघटनेची बुलडाणा येथे दिनांक १९ जानेवारी २५ रोजी बुलडाणा विभागीय पदाधिकीरी, सभासदांची कार्यकरत्यांची  जिल्हा बैठक संपन्न झाली या बैठकीचे अध्यक्षस्थानी बुलडाणा जिल्हा रिपाई आठवलेंचे जिल्हासंपर्क प्रमुख, बुलडाणा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे मुख्यसंघटक, एसटी कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे मा. राज्यउपाध्यक्ष पत्रकार बाबासाहेब जाधव होते तर प्रमुख उपस्थीती लॅार्ड बुध्दा तथा नवराष्ट्र इलेक्टॅानिक मिडीयाचे जिल्हाप्रतिनिधी, मराठी पत्रकार संघाचे जिल्हासचिव पत्रकार दिपक दादा मोरे, कास्ट्राईब संघटनेचे वरिष्ठ नेते माजी सहाय्यक वाहतूक निरिक्षक आत्माराम चौतमोल, कास्ट्राईब संघटनेचे माजी विभागीय सचिव पद्दमाकर डोंगरे, बुलडाणा आगाराचे माजी डेपोध्यक्ष जेष्ठ नेते हार्षदिप सोनपसारे होते. 

 सर्वप्रथम बुध्दवंदनेने व फुले,शाहू, डॅा. बाबासाहेब आंबेडकर, माताजिजाऊ, मातासावित्री, मातारमाई यांना नतमस्तक होऊन बैठकीस सुरूवात करण्यात आली. 

    या महत्वपूर्ण बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर उपस्थीतांनी प्रकाश टाकला संधटनेच्या १९८० सालापासून संघटनेची चाललेली आक्रमतेने कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कसे लावून धरावयाचे व सविधानीक मार्गाने न्याय कसा मिळवून दिला. महाकवी वानदादा म्हणतात “ भिमा तूझ्या मताचे जर चार लोक असते तर तलवारीचे ते न्यारेच टोक असते “ संघटनेत कीती आले कीती गेले संघटना ही संघटनाच राहते ती कोणावाचून बंद पडत नाही ती चालूच राहते माझ्यामुळे संघटना आहे हा विचार कोणीच करू नये फक्त संघटनेत एका विचारसरनिचे संघटन असले की, संघर्ष करता येतो व या एकसंघ राहून यावर हामखास न्याय मिळवीता येतो त्यासाठी एकविचार एक संघ म्हत्वाचा आहे आपण कीती आहो त्यापेक्षा आपले संघटन कीती आहे यावर न्याय मिळतो तो ताबडतोब मिळतो कधी उसीरा मिळतो पण मिळतो, आपल्या कामच्या कर्यावर संघटना वाढते, सर्व जातीधर्माच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्या आपोआपच कर्मचारी आपल्याकडे वळल्या जातात जे इतर संघटनेचे लोक म्हणतात ही एका जातीची संघटना आहे व असा अपप्रचार करतात त्यांना धडा शिकवीण्यासाठी कर्मचाऱ्यांना न्याय कसा मिळेल यावर लक्ष केंद्रीत करा व न्याय मिळवून द्या तेव्हा जे लोक संघटना ही एका जातीची आहे जातीयवादी आहे असे म्हणारे लोकांना आपण म्हणू शकतो की, तूम्हीच जातीयवादी आहात पण हे करण्यासाठी कोणत्याही जातीचा असो त्याचा विचार करू नका त्यावर कोणता अन्याय झाला याचा विचार करा काम करत राहा. एकसंघ राहा आपण सर्व एकसंघ राहू असी यावेळी प्रार्थणा करू. 

     मी माझी राजकीय, पत्रकारीतेची ताकत तूमच्या न्याय हक्कासाठी तनमनधनाने देण्यास तयार आहे तूम्ही मला केव्हाही फोन करा संपर्क साधा मी तुमच्यासाठी चोवीस तास हजर राहील असे आश्वासन बाबासाहेब जाधव यांनी दिले. 

      यावेळी जिवन जाधव, प्रताप वानखडे, दिपक मिसाळकर, दिपकदादा मोरे,आत्माराम चौतमोल, पद्दमाकर डोंगरे,रवि आवसरमोल, लक्ष्मी बंड, भारत आराख, विजय खंडारे, जितेंद्र साळवे, सिध्दार्थ खराटे यांनी उपस्थीतांना मार्गदर्शन केले. यानंतर सविधानीक लोकशाही मार्गाने विभागीय कार्यकारणी आलेल्या जिल्हाभरातून सातही डेपो मधून आलेले पदाधिकारी सभासद यांच्या सहमतीने व लोकशाही पध्दतीने २०२५ ची कार्यकारणी घोषीत करण्यात आली.

         

 विभागीयध्यक्षपदी  दिपक मिसाळकर , विभागीय सचिवपदी भारत आराख, विभागीयकार्यध्यक्षपदी जीवन जाधव, विधीसल्लागार व मार्गदर्शक म्हणून पत्रकार बाबासाहेब जाधव, विभागीय सहसचिवपदी सिध्दार्थ खराटे, तर महीलाआघाडी विभागीयध्यक्षपदी लक्ष्मीताई बंड (डोंगरदिवे), सचिवपदी रेखा सपकाळ, बुलडाणा डेपोध्यक्षदी रवि आवसरमोल, सचिवपदी आशोक गवई,चिखली डेपोध्यक्षपदी  प्रताप वानखडे, सचिवपदी संतोष घेवंदे, मलकापूर डेपोध्यक्षपदी राजू गुरचवळे, सचिवपदी पी.आर. तायडे, मेहकर डेपोध्यक्षपदी विनोद वाठोरे, जळगांव जामोद डेपोध्यक्षपदी एस.एस. कळमकर,सचिवपदी आर.एच. तायडे यांची सर्वांच्या सहमतीने निवड करण्यात आली या विभागीय कार्यकारणीची व सातही डेपोचे अध्यक्ष डेपोसचिव निवडण्यात आली. सर्वांनी त्यांचे पुष्प गुच्छ देवून व घोषणाबाजी करून जल्लोत्साह करून सत्कार केला व त्यांच्या पूढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या या वेळी विमल जाधव, अश्विनी जाधव, व्हि.एच. खिल्लारे, गजानन देशमुख, भाऊसाहेब सरदार, एस.डी. कुळकर्णी, श्याम कऱ्हाले, प्रमोद पवार, गजानन सरदार, केशव बोर्डे, गौतम जाधव, गजानन जाधव जिल्हाभरातील सातही डेपोतील कास्ट्राईब राप कर्मचारी पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थीत होते. या बैठकीचे प्रस्तावीक प्रताप वानखडे यांनी केले तर सुत्रसंचलन जीवन जाधव तर आभार प्रदर्शन बुलडाणा डेपोध्यक्ष रवि आवसरमोल यांनी केले राष्ट्र गीताने बैठकीची सागता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here