बुलडाणा येथील एसटी विभाग नियंत्रक यांची आर्थिक व्यवहाराची चौकशी करा – गजानन माने 

0

व्यवस्थापकीय संचालक रा.प. मध्यवर्ती मुंबई यांच्याकडे निवेदनाव्दारे कामगार सेनेची मागणी 

बुलडाणा, (प्रतिनिधी )- 

      बुलडाणा येथील विभाग नियंत्रक यांनी कर्मचारी यांचेकडून केलेले आर्थिक व्यवहार तसेच कर्मचाऱ्यांची पिळवणूक केल्याप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी व्यवस्थापकीय संचालक रा.प. मध्यवर्ती मुंबई यांच्याकडे २३ एप्रिल २०२४ रोजी एका निवेदनाव्दारे केली आहे 

दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, बुलडाणा विभागातील महाराष्ट्र एस. टी. कामगार सेनेच्या पदाधिकारी, सभासद यांचेवर जेष्ठता डावलून के. टी. सोनुने स.वा.नी. हे विभागीय कार्यालयात सर्वात जेष्ठ असतांना त्यांना डावलून सर्वात कमी जेष्ठा कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक व्यवहार करून वाहतूक निरिक्षक पदाची बढती दिली आहे. बढती, बदल्या, नियुक्तीवर रापचे सर्व नियम डावलून फक्त जो आर्थिक व्यवहार करून तसेच प्रतिनियुक्ती चालक यांना नियुक्ती देण्याकरीता विभागातून अर्ज मागविले होते, यामध्ये चालकांचे नांव पाठवितांना बुलडाणा विभागात कोणतीही सेवा जेष्ठता न पाहता व अर्थपूर्ण व्यावहार करून सरास रापचे नियम धाब्यावर बसविले जात आहे. अनुकंपा प्रकरणे प्रकरणी कु. निशा लोंढे यांनी अनुकंपा प्रकरणामध्ये कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही मुद्दाम हेतुपुरस्सरपणे त्यांचे अनुकंपा प्रकरण प्रलंबित रहावे या उद्देशाने त्यांचे प्रकरण अद्याप पर्यंत मध्यवर्ती कार्यालयाकडे का ? पाठविलेले नाही न पाठविण्या मागे काही तरी दडलेले दिसते, शेगांव आगारातील विठ्ठल पांडूरंग बहाड यांना हेतुपुरस्सरपणे अद्यापर्यंत वार्षिक वेतनवाढ देण्यात आले नाही, असे स्पष्ट होत आहे, तरी प्रकरणी चौकशी करावी,  निवेदनात नमूद आहे.

         पुढे निवेदनात नमूद आहे की, बुलडाणा विभागात विभाग नियंत्रक १ मार्च २०२३ रोजी विभाग नियंत्रक रूजू झाले तेव्हापासून तर ते अद्यापपर्यंत ज्या चालक, वाहक, यांत्रिक, वाहतुक नियंत्रक, वाहतुक निरिक्षक यांच्या ज्या बढत्या, बदल्या, नियुक्ती देतांना सर्व प्रकारच्या जेष्ठता डावलून मर्जीतील लोकाना बढती, बदल्या व नियुक्ती देतांना आर्थिक व्यवहार करून सर्वच कामगारांकडून पैसे घेऊन नियमबाह्य व सेवा जेष्ठता तसेच कुठल्याच कामगारांचा विनंती अर्ज न पाहता बढती, बदली व नियुक्ती नियम बाह्य आर्थिक व्यावहारातून देण्यात आल्या आहे असे अनेक प्रकरणाची विभाग नियंत्रक यांच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्यात यावी, असे निवेदन रा.प. विभाग कार्यालय, बुलडाणा यांच्या मार्फत उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रा.प. मध्यवर्ती मुंबई यांच्याकडे केली आहे, दिलेल्या निवेदनावर गजानन सु. माने राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र एस.टी. कामगार सेना, मुंबई यांची सही आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here