बृजभूषण सिंह यांना पदावरून हटवलं, कुस्तीपटूंनी आंदोलन थांबवलं

0

नवी दिल्ली : गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटू आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन सुरू होतं.

ऑलिम्पिक विजेत्यांसह दिग्गज खेळाडूंनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्षं आंदोलनाकडे लागलं होतं. त्यात सलग दोन दिवस केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची चर्चा सुरू होती. अखेर काल (20 जानेवारी) रात्री उशिरा कुस्तीपटूंनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घोषित केला.

कुस्तीपटूंसोबत पत्रकार परिषद घेत अनुराग ठाकूरांनी माहिती दिली की, “खेळाडूंनी केलेल्या आरोपांची पुढील चार आठवड्यात पूर्ण चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत बृजभूषण सिंह यांना कुश्ती संघटनेपासून दूर ठेवलं जाईल.”

गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीतील जंतर-मंतरवर कुस्तीपटू आंदोलन करत होते. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. बृजभूषण सिंह यांच्याविरोधात हे आंदोलन सुरू होतं.

ऑलिम्पिक विजेत्यांसह दिग्गज खेळाडूंनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर संपूर्ण देशाचं लक्षं आंदोलनाकडे लागलं होतं.

त्यात सलग दोन दिवस केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यासोबत कुस्तीपटूंची चर्चा सुरू होती. अखेर काल (20 जानेवारी) रात्री उशिरा कुस्तीपटूंनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घोषित केला.

कुस्तीपटूंसोबत पत्रकार परिषद घेत अनुराग ठाकूरांनी माहिती दिली की, “खेळाडूंनी केलेल्या आरोपांची पुढील चार आठवड्यात पूर्ण चौकशी केली जाईल आणि तोपर्यंत बृजभूषण सिंह यांना कुश्ती संघटनेपासून दूर ठेवलं जाईल.”

या पत्रकार परिषदेत पैलवान बजरंग पूनिया यांनी म्हटलं की, “सर्व खेळाडूंना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आश्वासन दिलंय आणि सर्वांना समजावलंय. आम्ही आता आंदोलन थांबवत आहोत. आम्हाला सरकारनं आश्वासन दिलंय. आम्हाला न्याय मिळेल, यावर आमचा विश्वास आहे.”

अनुराग ठाकूर यांच्या माहितीप्रमाणे, “खेळाडूंच्या आरोपांच्या चौकशीसाठी ओव्हरसाईट कमिटी स्थापन केली जाईल. पुढच्या 4 आठवड्यात ही कमिटी चौकशी पूर्ण करेल. चौकशी पूर्ण होईपर्यंत कमिटीच संघटनेचं काम पाहील. तोपर्यंत कुश्ती संघटनेचे अध्यक्ष बृजभूषण सिंह हे दैनंदिन कामकाजापासून दूर राहतील आणि चौकशीत सहकार्यही करतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here