उरण दि १०(विठ्ठल ममताबादे)भारतात तसेच महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीकोणातून दिनांक ०९/१२/२०२४ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उलवे नोड पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन रजाने यांची भेट घेतली.
भेट घेऊन उलवे नोड गव्हाण विभागात बांगलादेशी आणि रोहिंगे बऱ्याच प्रमाणात राहतात त्यांना पकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करुन त्यांना त्यांच्या देशात पाठवण्यात यावे. असे लेखी निवेदन देण्यात आले.
यावेळी उलवे शहर अध्यक्ष राहुल बाबुराव पाटील,पनवेल तालुका उपाध्यक्ष निर्दोष केशव गोंधळी, गव्हाण विभाग अध्यक्ष आकाश श्रीकांत देशमुख, गव्हाण विभाग उपाध्यक्ष प्रितम पंढरीनाथ तांडेल, वहाळ विभाग उपाध्यक्ष राजेश शंकर परमेश्वर, वाहतूक सेनेचे अमित विनायक पाटील, महाराष्ट्र सैनिक स्वप्निल गाडके आदि पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.