सातारा : बेडगबाबत लॉंगमार्च सुमारे दीडशे कुटुंबातील लहान बालकापासून महिला,युवक, कार्यकर्ते आदींनी सुरू केलेला आहे.प्रशासनाने ठोस भूमिका घेऊन हालअपेष्टा थांबवावी. त्वरित न्याय देऊन संवेदना असल्याचे दाखवून द्यावे.अशी भावना संविधान लोकजागर परिषदेचे संघटक सामाजिक कार्यकर्ते अनिल वीर यांनी व्यक्त केली आहे.
लॉंगमार्चमध्ये तब्बल ५०० जणांनी फक्त बाबासाहेबांच्या नावासाठी उन्हा-पावसात सहभाग घेतला आहे.अहो,त्यांची ठिकठिकाणी सोय होत असली तरीही त्या लहानशा बालकाचे, युवक,युवतीचे भविष्य काय ? सर्वांच्याच शारीरिक व्याधी वाढत आहेत. उत्तरोत्तर रुग्णालयात भरती होत आहे.असेच चित्र काही दिवस चालू राहिले तर महाभयंकर अनर्थ घडू शकेल. तेव्हा आतातरी प्रशासन, बेडग ग्रामपंचायत, सांगली जिल्हा परिषद, आमदार, खासदार ते उपमुख्यमंत्री – मुख्यमंत्री यांनी पहिल्यांदा बोळवण केली होती.तशी न करता संविधानाचे राज्य असल्याचे दाखवून द्यावे. अशी आर्त हाक सर्व स्तरांतून येत आहे.