सातारा: सांगली जिल्ह्यातील बेडग गावात असणारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असणारी प्रवेशद्वार स्वागत कमान पाडल्याने राज्यभरात खळबळ उडाली होती बाबासाहेबांच्या सन्मानासाठी आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांची कमान उभारण्यासाठी बेडग गावात असणाऱ्या सर्व भीम अनुयायांनी गाव सोडून मुंबईकडे पायी लॉन्ग मार्च काढला आहे 400 हून अधिक लोक कुटुंबीयसह रस्त्यावर उतरले आहेत
हा लॉंग मार्च सुरू झाल्यापासून या 400 हून अधिक लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे
लॉंग मार्च मध्ये असणाऱ्या काहींना डेंग्यूची लागण झाली आहे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे दोन दिवसापूर्वी हा लॉन्ग मार्च सातारा जिल्ह्यात दाखल झाला होता
साताऱ्यातही काही आंदोलकांची तब्येत खालवली असल्याने आणखी काही जणांना रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती हाती आली आहे
यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांनी
आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरूनही सरकार गंभीर दखल घेत नसल्याने आज 22 सप्टेंबर रोजी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सातारा शहराच्या हद्दीत रास्ता रोको केला होता
लॉन्ग मार्चमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट जिल्हाध्यक्ष अशोक बापू गायकवाड स्वप्निल गायकवाड अण्णा वायदंडे आप्पा तुपे
चंद्रकांत खंडाईत यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या लॉन्ग मार्चमध्ये सहभागी होते
विविध संघटनांनी या लॉन्ग मार्चला पाठिंबा दिला होता त्या संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते लॉन्ग मार्चमध्ये सहभागी होते