पैठण,दिं.१: पैठण तालुक्यातील बोरगाव सोसायटीवर राज्याचे रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे वर्चस्व विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी मारुती बोबडे तर व्हॉईस चेअरमनपदी बाबासाहेब वीर यांची एकमताने निवडकरण्यात आली .
सहाय्यक निबंध कार्यालयात तालुका सहाय्यक निबंधक अनिल पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली येसगे गट सचिव संगीता मुळे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली . यावेळी सोसायटीचे नूतन जेष्ठ संचालक कैलास पुंड, गणेश बोबडे, दगडू हिवराळे, लक्ष्मण बोबडे, रुखमनबाई अवधूत यांची उपस्थितीतीत नवनिर्वाचित चेअरमन मारुती बोबडे तर बाबासाहेब वीर व्हाईस चेअरमन पदी सर्वांनुमते निवड करण्यात आलीयावेळी चेअरमन मारुती बोबडे म्हणाले की राज्याचे रोहयो मंत्री तथा पालकमंत्री संदिपान पाटील भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळात संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सभासदाचे हित जोपासले जाणार असल्याचे यावेळी चेअरमन बोबडे म्हणाले .या निवडीबद्दल माजी सभापती विलास बापू भुमरे ,उपसरपंच सखाराम बोबडे, निवृत्ती बोबडे, सुभाष बोबडे, राघु अवधूत, साईनाथ अवधुत सह आदींनी अभिनंदन केले आहे .
फोटो .
पैठण बोरगाव सोसायटीच्या चेअरमन व्हाईस चेअरमन सह संचालक मंडळ .(छायाचित्र : विनायक मोकासे)