रविराञी एक वाजे पर्यंत तलाठी कार्यालय चालू होते, शेतकऱ्यांना मिळाला दिलासा
800 शेतकऱ्यांना मिळाले उतारे, पिकांची घेतली नोंद
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी
शेतकरी कधी अतिरीक्त पाऊसामुळे तर कधी दुष्काळाने होरपळला जातो. महसुल विभागातील सरकारी काम म्हणजे सहा महिणे थांब अशी अवस्था कायम पहावयास मिळते.परंतू या ब्राम्हणी येथिल कामगार तलाठी जालिंदर ंपाखरे अपवाद ठरले आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पाण्याखाली जावून सडली असल्याने पिकांचे पंचनामे करण्याचे मंञालयातून आदेश आले. पंचनामे करण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने शेतकऱ्यांनी माझ्या पिकाचा पंचनामा व्हावा यासाठी तलाठी कार्यालयात गर्दी करण्यास सुरवात केली. अवघा एकचा दिवसच पंचनामा करण्यासाठी शिल्लक असल्याने पंचनामा करण्यासाठी सात बारा आठ अ चे उतारे व बँकेची माहिती भरुण घेण्यासाठी रविवारी राञी एक वाजे पर्यंत तलाठी कार्यालय चालू होते.गर्दीचा उच्चांक पहाता तलाठ्याच्या मदतीला त्यांचा मुलगा जयेश जालिंदर पाखरे, मेहुणा अमित ढाकणे मदतीला धावून आले.ब्राम्हणी येथिल शेतकऱ्यांचे उतारे, आठ अ, बँक माहिती गोळा करुन पिकांची नोंद राञी उशिरा पर्यंत लावल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.800 शेतकऱ्यांची झाली कामे.
राहीरी तालुक्यातील ब्राम्हणी या गावातील शेतकऱ्यांना पिक विम्यासाठी पिकांची नोंद व सातबारा व ८ अ मिळविण्यासाठी ब्राम्हणी तलाठी कार्यालयात शेतकऱ्यांची रविवारी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती. कमी वेळेत एवढ्या शेतकऱ्यांचा पंचनामा अशक्य असले तरी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व तहसीलदार एफ. आर शेख यांनी यासाठी वाढीव मुदत द्यावी अशी मागणी राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे
ब्राम्हणी तलाठी कार्यालयात रविवारी राञी कार्यालयात जेवढी गर्दी तेवढी कार्यालयाच्या बाहेर गर्दी होती. दुचाकी व चारचाकी वाहनांची तोबा गर्दी पहायला मिळाली. आठ दिवसापासून ब्राह्मणी परिसरातील वाड्यावर शेतात जावून पाणी व चिखल तुडवत कामगार तलाठी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पंचनामे केले. सोमवारी शेवटची मुदत असल्याचे गृहीत धरून शेतकऱ्यांनी रात्रीचा दिवस करत तलाठी कार्यालयात उतारे पिक नोंदणीसाठी तोबा गर्दी केली होती. 700 ते 800 शेतकऱ्यांचे सातबारा उतारे व बँकेची माहिती भरुन पिकांची नोंद घेण्यात आली.
कामगार तलाठी एवढ्या कामाचा ताण असला तरी न डगमगता कामगार तलाठी जालिंदर पाखरे व सहकारी सुधाकर (महम्मद ) वैरागर, विकास साठे यांच्यासह कामगार तलाठी यांचा मुलगा जयेश जालिंदर पाखरे, तलाठी यांचे मेहुणे अमित ढाकणे मदतीला धावून आले. दोन लॅपटॉपच्या माध्यमातून उतारे काढणे व पिकांची नोंद करणे राञी 1 वाजेपर्यंत उशिरा कामगाज सुरू होते. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
महसुल विभातील कामकाज म्हटले की,सहा महीणे थांब हा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येतो. परंतू हा अनुभव जालिंदर पाखरे यांनी मोडीत काढून शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले.