भारतीय किसान काँग्रेसचा मोर्चा ११ डिसेंबरला विधानभवनावर धडकणार

0

कोपरगाव : भारतीय किसान काँग्रेस यांच्या वतीने चार डिसेंबर रोजी नंदुरबार येथून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेतकरी किसान काँग्रेसचे पराग पाष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. ही यात्रा नंदुरबार, धुळे जळगाव बुलढाणा अकोला अमरावती वर्धा या मार्गाने जाणार असून शेवटी 11 डिसेंबर रोजी विधिमंडळावर शेतकरी व मजूर वर्गाच्या अनेक समस्या घेऊन धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती किसान काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात आली.

या रॅलीत किसान काँग्रेस कमिटी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष तथा शेतकरी संवाद यात्रा समन्वयक किशोर वानखेडे, विश्वंभर बाबर एडवोकेट राम कुऱ्हाडे सरचिटणीस महाराष्ट्र राज्य मोहम्मद रफीक पठाण नाशिक किसन काँग्रेस जिल्हाध्यक्ष संपतराव वक्ते कृष्णा चव्हाण किसान काँग्रेस मीडिया प्रतिनिधी मंगेश भारसाकडे समन्वयक विदर्भ विभाग किसान काँग्रेस कमिटी विजय जाधव अहमदनगर उपाध्यक्ष किसान काँग्रेस कमिटी यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक शेतकरी व मजूर या रॅलीमध्ये सहभागी झाले असून या पायी चाललेल्या किसान काँग्रेस ही शेतकऱ्यांच्या हितासाठी व समस्या मांडण्यासाठी थेट विधिमंडळापर्यंत नागपूरपर्यंत जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्षांनी दिली आहे.

राहुलची देशाला एकत्र करण्यासाठी चालले पटोले जी राज्याला एकत्र करण्यासाठी चालले परंतु किसान काँग्रेस कमिटी ही शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती राज्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे शेतकरी हवालदार झालेला आहे यासाठी व मजुरांच्या हितासाठी ही शेतकरी संवाद यात्रा किसान काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आली यात त्यांनी दिनांक 8 डिसेंबर पर्यंत अकोला विदर्भ पर्यंत मजल गाठली आहे पुढील 11 डिसेंबर पर्यंत किसान काँग्रेस शेतकरी संवाद यात्रा नागपूर मध्ये विधानभवनावरती जन आक्रोश मोर्चा मोठ्या जनसमुदायाने होणार आहे.

शेतकऱ्यांसाठी वीज पाणी शेतकऱ्यांचे आरोग्य कुटुंबाची आर्थिक स्थिती बी बियाणे खते व दैनंदिन गरजेच लागणाऱ्या सर्व वस्तूंचा दर जणू गगनाला भिडला आहे , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सरकारने जाहीर केलेल्या नुकसान भरपाईचे अनुदान तसेच पीक विम्याचे देखील येणारे हप्ते काही टक्केवारीची रक्कम अजून देखील शेतकऱ्याला मिळालेले नाहीत, सरकार फक्त घोषणाच करतंय ,आणि मजुरांचे आणि शेतकऱ्यांचे हाल अपेष्टा व्यथा सरकारला जणू विसर पडला की काय आणि या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठीच किसान काँग्रेस शेतकरी संवाद यात्रेला सुरुवात करण्यात आल्याचे समन्वयक यांनी सांगितले या यात्रेमध्ये महाराष्ट्रभरातील अनेक शेतकरी व मजूर सहभागी होऊन पायी चालत असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष किसन काँग्रेस कमिटी विजय जाधव यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here