आंबेडकरी शाहिरी जलसाने केले लोक प्रबोधन
येवला :
क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधकी शाहिरी जलसा परंपरेला आदर्श मानून आंबेडकरी शाहिरी शाहिरी जलसे उभे राहिले केवळ मात्र मनोरंजन न करता माणसांचे मन,मनगट,मेंदू घडवणं,स्वतःच्या धडावर स्वतःचा मेंदू ठेवण्याबरोबर ज्वलंत सामाजिक,राजकीय,धार्मिक,अर्थी,सांस्कृतिक प्रश्नांबद्दल लोक जागृती निर्माण करण्याचे काम लोककवी वामनदादा कर्डक यांच्या साहित्य शाहिरीचे गाणे गात धर्मांतर घोषणेच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त समकालीन तेचा लोकशाहीर शरद शेजवळ, शाहीर आकाश पवार प्रस्तुत आंबेडकरी शाहिरी जलसा कार्यक्रमातून करण्यात आले.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थिती शाहीर शरद शेजवळ यांनी तुझ्या हाती तूप आलं तुझ्या हाती साय,समाजाचं काय रं गड्या समाजाचं काय ? हे गीत सादर करून लोकप्रतिनिधीना वामनदादा कर्डक यांच्या गीतातून सवाल उपस्थित करून लोकप्रतिनिधीनी समाजातील शेतकरी,कामगार,कष्टकरी,बेरोजगार,महिला व मागासवर्गीय जनतेच्या ज्वलंत प्रश्नाकडे गीतांच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केले.
शा.आकाश पवार यांनी लोककवी वामनदादा कर्डक यांच्या वंदन माणसाला, दे कायेचे अन मायचे चंदन माणसाला ! कुणी बनविले धनी कुणाला कुणी बनविले दास कष्टकऱ्यांच्या गळी बांधला कुणी गुलामी फास ? असा सवाल करून दगड धोंड्याला वंदन न करता “करू वंदन माणसाला हो,वंदन माणसाला” ह्या गीताने आंबेडकरी शाहिरी जलसाची सुरुवात करण्यात आली.
साऊ पेटती मशाल,साऊ आग ती जलाल,साऊ शोषितांची ढाल,साऊ क्रांतीच पाऊल ह्या गीतानी सावित्रीमाई फुले यांच्या कार्य कर्तृत्वाचा आलेख मांडत तोच आदर्श आधुनिक महिला युवतींनी घ्या असा संदेश देणारे गीत गायिका ऐश्वर्या पवार यांनी सादर केले.
गायिका शीतल भंडारे यांनी स्त्री सुधारक माता यांच्या आदर्शाचे गीत शिवबाला जसे घडविले तिने तशी जिजाऊ बनवी,ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनवावी,दुखावलेल्या कोटी दिनाची आई रमाई बनवावी
मला जिजाऊ सावित्री रमाई माता
तुमच्या मध्ये दिसावी हे गीत सादर करण्यात केले
गायक धनंजय काकडे
गोदातीरी पडला तरी लढला सैनिक माझा उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा,माणसास पाणी पाजा माणसास पाणी,निनादात होती सारी भिमाचीच वाणी,इतिहास होता चवदार तळ्याचा ताजा हे वामनदादा कर्डक यांचं गीत काळजाचा ठाव घेऊन गेले.
भारताला लोकशाही खेरीज कोणतीच शाही वाचवू शकणार नाही त्याकरता भारतीय संविधान संविधानिक मूल्य विचार वाचले पाहिजे.ज्या प्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की संविधान कितीही चांगलं असलं पण ते संविधान योग्य राजकर्त्यांच्या हाती नसेल तर ते अयशस्वी होईल.आजच्या घडीला राजकीय नेते पक्ष क्षणोक्षणी घटनेची पायमल्ली करत असून त्यावर हि “संविधान वाचवा चलार गाडयांनो
संविधान वाचवा चला रं हे गीत श्रोत्यांना विचार करायला लावून गेले.” एकिच नरड चिराया बघतोय
मनुवादी ह्यो इळा र
संविधान वाचवा चलार गाडयांनो
संविधान वाचवा चला र.ह्या गीताने सर्वांचा लक्ष वेधून घेतलं.
लोकशाही वाचविण्यासाठी संविधान वाचलं पाहिजे असा संदेश देणार गीत यांनी सादर केले.
दाही दिशा नाटल्या कशा
एकीची घडऊ भाषा
एक करू कोटी जणांना
चला यारे या सारे या
सामजु संविधाना.
उजाड राणी किमया केलीस मोठी भीमा तुझं प्रणाम कोटी कोटी,भिम माझा लढे देत होता मला समतेकडे नेत होता.ह्या शाहीर शेजवळ यांनी सादर केलेल्या गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.
देशातील ज्वलंत सामाजिक प्रश्न,मतपत्रिकेचा आग्रह व जल,जंगल,जमीन ह्या बद्दलचे प्रहन
“बाई इकता इकता यांनी ईकला गं देश अन पालटलं भेश गं माझे माई…धक्का चावडीला देतो गं माझे माय” ह्या गीतातून मांडण्यात आले.
एक निळा आणि एक भगवा..
माझा आजा म्हणे बाप..
देव्हार बाजूला सरल
पिंपळच्या पानावर.
भिम राव माझा…..
उद्धारली कोटी कुळे
पैदा होतो भीमसा नर….
आले महात्मा फुले….
बुद्ध कबीर भीमराव फुले…
ह्या व अशा अनेक गीतातून बुद्ध कबीर तुकोबा छत्रपती शिवराय फुले-शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
आंबेडकरी शाहीरी जलसा कलावंत गायक ऐश्वर्या जाधव-पवार,शाहीर आकाश पवार,शीतल भंडारे,भिमराव खेत्रे,धनंजय काकडे यांनी ज्वलंत सामाजिक ,धार्मिक,आर्थिक,राजकिय विषयावर विविध प्रबोधनात्मक गीतांचे सादरीकरण केले.
अर्जुन येरबागे (ढोलकी),
संतोष चंदनशिवे (हार्मोनियम),ताल वाद्य सिद्धार्थ गुंजाळ,आरोह पवार,मनोज गुंजाळ यांनी साथ संगत केली. येवला पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ,येवला मर्चंड कॉ.बँक चे संचालक सुभाष गांगुर्डे,गुड्डू जावळे,सुरेश सोनवणे,विकास घोडेराव ह्या वेळी उपस्थित होते.
मुक्ती महोत्सवाची आंबेडकरी शाहिरी जलसा,रक्तदान,ग्रंथदान उपक्रमाने सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्तीभूमी सार्वजनिक वाचनालय, राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तीभूमी अभ्यासिका येवला यांच्या सदस्य पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.