बुलडाणा,(प्रतिनिधी )-
बुलडाणा जिल्ह्यात अवघ्या वर्षभरात राजकारणात दमदार ‘एण्ट्री’ करत आपल्या कार्याची छाप जिल्ह्याच्या राजकीय पटलावर उमटविणारे मुकनायक फाऊंडेशनचे संस्थापक सतीश पवार यांच्या समाजिक, राजकीय कार्याची दखल भीम आर्मीने घेतली आहे. सतीश पवार यांच्यावर भिम आर्मी या आक्रमक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली आहे. सतिश पवार यांनी वंचित बहुजन आघाडीचे रात्रंनदिवस स्वत:ची व घरादाराची परवा न करता स्वत:ला झोकून देऊन जिल्हा भर पक्षकार्य केले, पण ‘वंचित’ने फारशी दखल न घेतल्याने युवा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता मात्र आपणास भीम आर्मीने जिल्ह्याची मोठी जब्बदारी दिली, त्या पदाला ताकदीने लढण्याचे बळ दिल्याने पदाला न्याय देण्यासोबतच सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायम झटत राहणार आणि संघटनही मजबूत करणार, अशी ग्वाही सतीश पवार यांनी नियुक्तीनंतर आपली प्रतिक्रिया देताना दिली.
खासदार ॲड. चंद्रशेखर आझाद (रावण) यांच्या नेतृत्वाखालील भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या बुलडाणा जिल्हाध्यक्षपदी सतीश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजकारणात येण्यापूर्वी पवार सामाजिक कार्यात सक्रिय होते. तसेच मूकनायक फाउंडेशनच्या माध्यमातूनही त्यांनी चळवळीचे कार्य सुरू ठेवले. विदर्भातील बुलडाणा जिल्हा हा आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला समजला जातो. भीम आर्मीचे संस्थापक ॲड. चंद्रशेखर आझाद हे उत्तर प्रदेशातील नगिना लोकसभेवर दीड लाखाच्या मतधिक्क्याने निवडून आले. त्यांच्या या दणदणीत विजयामुळे महाराष्ट्रातील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जनतेमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सतीश पवार यांच्या निवडी मुळे बुलडाणा जिल्ह्यातील फुले,शाहू, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्यांन मध्ये उत्सवाचे वातावरण पसरले आहे,