उरण दि 3(विठ्ठल ममताबादे )भेंडखळ येथील नवतरूण नवरात्रौत्सव मंडळ,म्हातार आळी यांच्यातर्फे आयोजित शून्य सर्पदंश अभियान कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला.नवरात्री निमित्त आयोजित फ्रेंड्स ॲाफ नेचर संस्थेमार्फत या कार्यक्रमात सर्व प्रकारच्या सापांची ओळख माहिती व घ्यावयाची काळजी हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखविण्यात आले..साप चावल्यानंतर सर्वप्रथम कोणती उपाययोजना करावी, विषारी व बिनविषारी साप यांची संपुर्ण माहिती देण्यात आली.
या उपयुक्त कार्यक्रमास नागरिकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
यावेळी मंडळातर्फे कार्याध्यक्ष लक्ष्मण ठाकूर,अध्यक्ष भारत ठाकूर,उपाध्यक्ष दयाघन ठाकूर, खजिनदार रोमेश ठाकूर,अनिल ठाकूर,शैलेश ठाकूर,चेतन घरत,सचिन भोईर,लंकेश ठाकूर,भावनेश ठाकूर,विशेष ठाकूर,अमित पाटील,किशोर ठाकूर,दिलीप ठाकूर,सागर पाटील सर्व पदाधिकारी व मंडळाचे सभासद तसेच फ्रेंड्स ॲाफ नेचर टीमचे प्रमुख शजयवंत ठाकूर व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.