गद्दारीचा कलंक पुसुन टाकू: प्रा नरेंद्र खेडेकर; सह सचिव सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात तहसील कचेरी वर धडकला प्रचंड मोर्चा
बुलडाणा,(प्रतिनिधी )-
मेहकर तहसिलवर लोकनेते फुलेशाहू आंबेडरी विचारधारेचे, समाजसेवेचा ध्यास असलेले प्रशासकीय सेवेचा दांडगा आभ्यास असलेले सहसचिव सिध्दार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली मेहकर तहसिलवर स्थानिक सत्ताधारी हुकूमशाही नेत्याच्या व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात परिवर्तन भव्यदिव्य मोर्चा न्याय मागण्या घेवून धडकला. महाराष्ट्र शासनाच्या व स्थानिक नेत्याच्या केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर सर्वात अगोदर स्वतःच्या बी ए एम एस कॉलेज ला मान्यता देण्याच्या फाईल वर सही केली तर भाजपाच्या एका माजी जिल्हाध्यक्ष यांच्या कॉलेजच्या मान्यतेसाठी 5 कोटीची मागणी केली. हेच गद्दारानी काम केले असून शारंगधर बालाजी ओळख असणारे मेहकर हल्ली गद्दारी नावाने ओळखल्या जायला लागले आहे. अशी परखड टीका करत असतांनाच विधानसभा निवडणुकीत मतांचे विभाजन टाळून महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी मतदार ठामपणे उभा राहल्यास येथील गद्दारी चा कलंक पुसून टाकू गद्दाराला इथल्याच मातीत गाडण्याचे काम आपण करू असा दावा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर यांनी मेहकर येथे केला.
शिवसेना नेते तथा माजी सहसचिव सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात परिवर्तन मोर्चा चे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. तर ज्यांना उद्धव ठाकरे यांनी पात्रता नसतांना देखील भरभरुन दिले अशांनी सत्तेच्या हव्यासापोटी गद्दारी केली अशी घणाघाती टीका शिवसेना नेते सिद्धार्थ खरात यांनी केली. ह्या मोर्चाला संबोधित करतांना प्रा नरेंद्र खेडेकर म्हणाले की, मतविभाजना मुळे झालेलं नुकसान मी व जिल्हा भोगत आहे,आता तशी वेळ येऊ देऊ नका.एकत्रितपणे काम करा, परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही,तर सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या मोर्चाची सुरुवात शिवसेना जनसंपर्क कार्यालय जानेफळ रोड मेहकर येथून करण्यात आली व नंतर या मोर्चाचे स्वातंत्र्य मैदानावर सभेत रूपांतर करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विचारपीठावर शिवसेना संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, आयोजक सिद्धार्थ खरात,उपजिल्हाप्रमुख प्रा आशिष रहाटे,तालुका प्रमुख निंबाजी पांडव,शहर प्रमुख किशोर गारोळे, दिलीप वाघ, डॉ गोपाल बच्छीरे, ऍड सुमित सरदार, ऍड आकाश घोडे,एन ए बळी,माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख नंदू कऱ्हाड,दीपक मापारी,ऍड संदीप गवई,श्रीकांत मादनकर,भास्करराव गारोळे,किसन पाटील,आदी हजर होते.
यावेळी मोर्चाचे आयोजक सिद्धार्थ खरात यांनी आपल्या भाषणात शेतकरी कष्टकरी यांच्या विविध मागण्यासह स्थानिक प्रश्नावर सडकून टीका केली. ‘हौसला बाकी रखो,वक्त बदलणे वाला है’ या शेर ने भाषणाची सुरुवात करत स्थानिक प्रश्नांना हात घातला.ते म्हणाले की मेहकर मतदारसंघात तरुणांच्या हाताला साधा रोजगार देखील लोकप्रतिनिधी देऊ शकले नाहीत.येथील एमआयडीसी केवळ कागदावर आहे. त्यामुळे केवळ १०-१२ हजार रुपयांवर इथला तरुण चाकण,पुणे,छत्रपती संभाजी नगर इथे काम करायला जातो आहे.शेतीपूरक उत्पादन नसल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहे. विकासाचे प्रश्न न समजणाऱ्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत उलथून फेका असे आवाहन त्यांनी केले.
*केवळ वैयक्तिक विकास केला-* जालिंदर बुधवत-
इथल्या लोकप्रतिनिधीनी केवळ वैयक्तिक विकास केला. त्यांचा मॉल, त्यांचे थिएटर उभे राहत आहे परंतु सर्वसामान्य जनतेला त्यांनी काहीच दिले नाही. असा आरोप जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी केला. यावेळी प्रा आशिष रहाटे, ऍड सुमित सरदार, डॉ गोपाल बच्छीरे, यांनीही विचार व्यक्त केले. शेवटी आभार ऍड आकाश घोडे यांनी मानले.