जळगाव : “मदत करायची नसेल तर करू नका मात्र शेतकऱ्यांची टिंगल करू नका” अशा शब्दात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार याना टोला लगावला आहे. खडसे पुणे म्हणाले की कृषिमंत्री अब्दुल सत्तार शेतकऱ्यांची टिंगल करत आहेत, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कृषिमंत्र्यांकडून होत आहे, अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट शेतकरी दोन्ही संकटाने अक्षरशः भरडला गेला आहे. त्यातच राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यातील परिस्थिती ओला दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती नाही असे विधान केले आहे. कृषिमंत्री सत्तर यांच्या याच वक्त्यव्याचा खडसे यांनी आज समाचार घेतला . राज्यातील शेतकरी हा अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेला असतांना शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळायला हवी अशी मागणी होत असताना सत्तार यांच्याविधानावरून शेतकरी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.
राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना मदत सरकार करेल मात्र आता ओला दुष्काळ जाहीर करायची परिस्थिती नाही असे म्हंटले आहे.
कृषीमंत्री सत्तार यांच्या या विधानावरून शेतकारी वर्गात संतापाची लाट उसळली आहे, शेतात गेल्या सहा महिन्यांपासून पाणी तुंबलेले आहे, एकही पीक संपूर्णतः हाती लागत नाही अशी स्थिती अनेक ठिकाणी आहे.