मनोज जरांगेनी मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेत्यांचं आवाहन फेटाळलं!

0

आरक्षण मिळेपर्यंत उपोषणावर ठाम

जालना : मराठा आरक्षणाच्या Maratha Reservation मागणीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक मुंबईत पडली . या बैठकीत मराठा समाजाला “मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यावर एकमत झाले असून .त्याकारीताच्या सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण कसे देता येईल यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचे एकमत झाले . मात्र यासाठी काही कालवधी लागू शकतो . बैठक पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं. मात्र, Manoj Jarange मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत, उपोषणावर ठाम असल्याचं जाहीर केलं. तसेच सरकारचा कोणताही प्रतिनिधी आपल्यापर्यंत चर्चेसाठी आला नसून ,चर्चेसाठी उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावे असे आवाहनही जरांगे यांनी केले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे.

सर्वपक्षीय बैठकीनंतर तिकडे अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला.

जरांगे म्हणाले की, “सरकारला वेळ म्हणजे किती आणि कशासाठी पाहिजे? तसंच, सरसकट महाराष्ट्राला आरक्षण लगेच देणार का हे सांगावं, मग समाजाला विचारून पाहू.

“मला बैठकीचा तपशील समजलेला नाही आणि मला जाणून घेण्याचीही इच्छा नाही. माझ्या समाजातील गरिबांचा जीव जातोय आणि सरकारला काळजी नाही. ते हसत आहेत, याला जनता सांभाळणारं सरकार म्हणावं का?

“मला एक फोन आला की, तुम्ही त्यांना अरे-तुरे करून फार फाडफाड बोलता, तर ठिक आहे, आरक्षण देणार असेल तर मी बोलणं बंद करतो. पण तुम्हाला बोललेलं वाईट वाटतं, पण आमची लेकरं पिढ्यानं पिढ्या हाल सहन करतात ते वाईट वाटत नाही. पण तुमच्याबद्दल एखादा वाईट शब्द बोललो तर निरोपावर निरोप येतात.

“मराठा समाजाला आरक्षण देण्यासंबंधी सर्व पक्षांचं एकमत आहे. मात्र, कायद्याच्या सर्व बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण दिले जाऊ शकते. त्यासंदर्भात राज्यातील सर्व पक्ष एकत्रितपणे काम करण्यास तयार आहेत,” असं सर्वपक्षीय बैठक बोलावलं आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीला सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली.

या सर्वपक्षीय बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, दिलीप वळसे – पाटील, बाळासाहेब थोरात, सुनिल तटकरे, विजय वडेट्टीवार , जयंत पाटील, चंद्रकांत पाटील, छगन भुजबळ, सुनील प्रभू, अंबादास दानवे, कपिल पाटील हे नेते उपस्थित होते.

दरम्यान, महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाळपोळ सुरूच आहे. सोलापूर पुणे महामार्गावर मराठा आरक्षणासाठी मराठा बांधवांकडून रस्ता रोको करण्यात आला आहे. तसंच बाळे येथे रास्ता रोको करत टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. सोलापूर पुणे महामार्गावर धुराचे लोट दिसत आहेत. तसंच सोलापूर पुणे महामार्गावर वाहतुकीच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here