मनोज जरांगे 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार

0

बीड : अंतरवाली ते मुंबई पायी करणार पायी प्रव्गास मराठा आरक्षण देण्याच्या ‘24 डिसेंबर’ या अल्टिमेटमच्या एक दिवस आधी मनोज जरांगे यांनी बीडमध्ये जाहीर सभा घेतली. या सभेत जरांगे यांनी 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. आमरण उपोषणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथून पायी चालत मुंबईला पोहोचणार असल्याची जरांगेंनी घोषणा केली आहे.

याआधी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे जरांगे यांनी दुसऱ्यांदा उपोषण केलं तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आपण मराठ्यांना आरक्षण देऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर जरांगेंनी उपोषण सोडलं होतं. पण अजूनही या मुद्द्यावर तोडगा निघल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे ‘आम्ही शांततेत आंदोलन करू, पण आंदोलन होणारच,’ असा मनोज जरांगे यांनी पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याची मनोज जरांगे यांनी मागणी केली आहे. बीडमधील भाषणात जरांगे यांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता सडकून टीका केली.

बीडमधील ‘इशारा’ सभेत मनोज जरांगेंनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. –

  • *बीडमध्ये जाळपोळ झाली तेव्हा आमच्यावर खोटा डाग लावला आणि मराठा बांधवांना तुरुंगात टाकण्यात आलं.
  • *मराठ्यांनी शांततेत रॅली काढल्या. कधीही जाळपोळ केली नाही.
  • *मराठ्यांची लेकरं आत्महत्या करतायत, कुणबी नोंदी सापडल्या तरीही सरकार आरक्षण देत नाहीये.
  • *20 जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार.
  • *आंदोलनासाठी स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघाणार.
  • *वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडे कूच करतील.
  • *जर कुणी जाळपोळ केली आणि गोंधळ घातला तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्या. सरकारला नको पण पोलिसांना सहकार्य करा.
  • *जर पोलिसांनी जाणूनबुजून मराठ्याच्या तरुणाला ताब्यात घेतलं तर, फक्त पोलीस स्टेशनच्या बाहेर जाऊन बसा.
  • *सरकारशी आम्ही सगळ्यांसमोर चर्चा करणार, भींतीआड चर्चा होणार नाही.
  • *कायद्याच्या अधीन राहून आम्ही मुबंईत आमरण आरक्षण करणार.
  • *मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री यांना विनंती आहे सरकारने शहाणपणची भूमिका घ्यावी
  • *आमच्या नादाला लागाल तर राजकीय अस्तित्व संपवू, आता आरक्षण नाही दिले तर सरकारला जड जाणार.
  • *देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार.
  • *पोरांना अटक झाली तर मराठ्याच्या महिलांनी आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जावून बसा.
  • *सरकारला दहा बारा दिवस मिळतायत ते बघा, एकदा अंतरवालीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here