मयुरी सावंत यांची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल भारतीय पत्रकार संघाच्या वतीने सत्कार.

0

बारामती:(वाघळवाडी-सोमेश्वरनगर) येथील मयुरी महादेव सावंत यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत प्रचंड मेहनत घेत यश मिळवले व पोलीस उपनिरीक्षक पद मिळवले. याबद्दल त्यांचा भारतीय पत्रकार संघाच्या वतीने करंजे येथील संपर्क कार्यालयात सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी करंजे सरपंच भाऊसो हुंबरे, तंटामुक्ती अध्यक्ष प्रताप गायकवाड, पोलीस पाटील राजेंद्र सोनावणे तसेच प्रमुख उपस्थितीत भारतीय पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सिकंदर नदाफ, पुणे जिल्हाध्यक्ष तैनूरभाई शेख होते. 

तसेच पुणे जिल्हा सचिव काशिनाथ पिंगळे, बारामती तालुका अध्यक्ष विनोद गोलांडे , सचिव सुशीलकुमार अडागळे, संघटक महंमद शेख,बारामती सोशल मीडिया प्रमुख मधुकर बनसोडे ,ऋषिकेश जगताप, हर्षद हुंबरे यासह इतर पत्रकार बांधव उपस्थित होते. बहुचर्चित असलेल्या भारतीय पत्रकार संघाने माझ्या निवडीची दखल घेतली व माझा सन्मान केला त्याबद्दल मी पत्रकार संघाचे कायम आभारी राहील, नक्कीच मी एक कर्तव्यदक्ष,जबाबदार,पोलीस अधिकारी म्हणून माझ्या गावाचा,तालुक्याचा,जिल्ह्याचा नांव लौकिक वाढवेन असे मयुरी सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here