मलकापूर आगार एसटी कास्ट्राईबच्या डेपोध्यक्षपदी राजू गुरचवळे, सचिवपदी प्रितेश तायडे

0

मलकापूर,(प्रतिनिधी)- मलकापूर आगार राज्यपरिवहन कर्मचारी संघटनेची बैठक २ फेब्रुवारी २५ रोजी मलकापूर तालुक्यातील नलगंगा धरणावर मलकापूर आगार कास्ट्राईब संधटनेची बैठक कार्यकारणी निवडण्याती बैठक आयोजीत केली होती. यावेळी मलकापूर आगाराची २०२५ ची कार्यकारणी बिनविरोध जाहीर करण्यात आली. डेपोध्यक्षपदी राजू गुरचवळे, डेपोसचिव प्रितेश तायडे, डेपोउपाध्यक्षपदी राष्ट्रपाल सुरळकर, कोषाध्यक्ष नितीन मोरे, सहसचिव सोनल कांबळे, संघटक विनोद गायकवाड, कार्यध्यक्ष मिलींद मेढे, प्रसिध्दी प्रमुख नितीन शेळके, सदस्य निबाजी मोरे, व्हि.आर.सरकटे, आर.जे. पंडीत यांच्या नावाची अध्यक्षांनी घोषणा केली व सर्व सभासदांनी त्यास सहमती दिली त्यांचा टाळ्यांचा आवाजात घोषणा बाजी करून त्या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्याना पुढील भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 

सर्वप्रथम फुले,शाहु, डॅा. बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ,माता सावित्री,माता रमाई यांना त्यांच्या विचारांना व स्मृतींना नतमस्तक होऊन बैठकीची सुरवात करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्ष संघटनेचे जेष्ठनेते संघटनेचे राज्यउपाध्यक्ष व रिपाईचे आठवलेंचे बुलडाणा जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव होते. एसटी कास्ट्राईबचे जिल्हध्यक्ष  दिपक मिसाळकर,जिल्हासचिव भारत आराख,चिखली आगाराचे डेपो अध्यक्ष प्रताप वानखडे,बुलडाणा डेपोध्यक्ष रवि अवसरमोल, सिध्दार्थ खराटे, माजी सहाय्यक वाहतूक नियंत्रक के.व्ही. प्रधान, महादेव लांडे पाटील, विनोद गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त केले.  या कार्यक्रमाचे सुत्र संचलन राजू गुरचवळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सिध्दार्थ खराटे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here