राहुरी विद्यापीठ, दि. 22 सप्टेंबर, 2022 :
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीसह राज्यातील तीनही कृषि विद्यापीठातील शिक्षकवर्गीय अधिकार्यांना कारकीर्द प्रगती योजना (CAS) लागू करण्याबाबतची मागणी
सातत्याने विद्यापीठातील शिक्षकवर्गीय अधिकार्यांकडून होत होती. या संदर्भातील मागणीचा प्रस्ताव गेल्या 13 महिन्यांपासून शासन स्तरावर मंजुरीसाठी प्रक्रियेमध्ये होता. याबाबत कृषि विभागाचे मंत्री ना. अब्दुल सत्तार यांचे मान्यतेने कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली प्रधान सचिव (कृषि) एकनाथ डवले, सहसचिव (कृषि) श्री. रासकर, अव्वर सचिव (कृषि) उमेश चांदिवडे यांचे सहकार्याने कर्मचारी समन्वय संघ व सर्व लाभार्थी प्राध्यापक यांचे अथक परिश्रमातून शासन निर्णय निर्गमीत झाला. या कामी तत्कालीन संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, नियंत्रक डॉ. बापूसाहेब भाकरे, कुलसचिव प्रमोद लहाळे, कुलगुरुंचे विशेष कार्य अधिकारी डॉ. महानंद माने, कर्मचारी समन्वय संघाचे अध्यक्ष डॉ. सी.डी. देवकर, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे श्री. गोखले व त्यांचे सहकारी, सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, सहयोगी संशोधन संचालक, उपकुलसचिव (प्रशासन), अधिदान व लेखाधिकारी, प्रशासन व नियंत्रक कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे कारकिर्द प्रगती योजना विद्यापीठातील अधिकार्यांना लागु झाल्याचे समन्वय संघाचे उपाध्यक्ष डॉ. उत्तम कदम यांनी सांगितले. सदरची कारकीर्द प्रगती योजना राज्यातील चारही कृषि विद्यापीठातील शिक्षकवर्गीय अधिकार्यांना लागू झाल्यामुळे त्यांची बर्याच दिवसांची मागणी पुर्ण झाली आहे. यामुळे या शिक्षकवर्गीय अधिकार्यांना यथोचीत न्याय मिळाला असल्याची भावना विद्यापीठ वर्तुळातुन व्यक्त होत आहे.
Home महाराष्ट्र महात्मा फुले कृषि विद्यापीठातील शिक्षकवर्गीय अधिकार्यांना कारकीर्द प्रगती योजना लागू