देशात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराने जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे का?
मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ठेकेदार कंपनीचा संबंध काय? नगर परिषदेत सुरू असलेल्या बेजबाबदार कामकाजाला नेमका आशीर्वाद कोणाचा?
सातारा प्रतिनिधी; दिनांक 21/03/2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सातारा जिल्हा अध्यक्ष अशोक बापू गायकवाड रिपाई आठवले गटाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद महाबळेश्वर कंत्राटी कामगार यांचा थकीत पगार, मानवी मूल्यांचे हनन आणि हा माणूस वागणूक व शोषण केल्याप्रकरणी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर; नगरपरिषदेचे कंत्राटी सफाई कामगार यांचे सप्टेंबर 2024 मध्ये भाग्यदीपस् वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यामार्फत कामगारांचे जवळपास दोन महिन्यांचे वेतन बुडविले आहे. नगरपरिषदेने संबंधित कंपनीचे सर्व देयके अदा केले आहेत. मजुरांचा पगार थकीत असूनही कंपनीने देयके अदा केले आहेत. त्यामुळे कामगारांवर अन्याय झाला आहे.वारंवार अधिकाऱ्यांना सांगूनही अधिकारी दाद देत नाहीत. सप्टेंबर 2024 पासून विडिके संस्थेला काम दिले आहे. ही संस्था नाममात्र 360 याप्रमाणे मजुरी देत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. संबंधित कामगारांचे पीएफ इ. एस.आय. याची कपात केली जात नाही.हजेरी नोंदवही ठेवली जात नाही. जवळपास तीन वर्षापासून कामगारांना किमान वेतन या प्रमाणे वेतन मिळालेले नाही.
सफाई कामगार असणाऱ्या महिलांना सुरक्षा साधनांशिवाय कचरा विलगीकरण करण्याचे काम करावे लागत आहे. याकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. कामगारांची उपासमार होत असल्याने आज रिपाई आठवले गटाच्या वतीने प्रशासनाला जागे करण्यासाठी थाळी बजाओ आंदोलन करण्यात आले. सोबतच प्रशासनाने आज ऐन सणासुदीच्या काळामध्ये गरिबांना थाळी वाजवण्याची वेळ आणली आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. असे मत व्यक्त केले जात आहे.
याप्रकरणी रिपाई आठवले गटाच्या वतीने निवेदनात मुद्दे नमूद करण्यात आले आहेत. मुख्य अधिकारी आणि कनिष्ठ अधिकारी यांच्या अखत्यारित कामगार कायद्याचे उल्लंघन झाले आहे. मानवीय अधिकारांचे हनन झाले आहे. महिलांचे शोषण झाले आहे. इएसआय न भरल्याने वैद्यकीय सोयीसुविधांचा लाभ कामगारांना घेता आला नाही. यामुळे संबंधित ठेकेदार अधिकारी आणि अखत्यारीत असणारे नगरपरिषद कर्मचारी यांची खातेनिहाय,विभागीय चौकशी, करून त्यांच्यावर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार, गुन्हे दाखल करण्यात यावेत. अशी मागणी रिपाईच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी रिपाई आठवले जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, रिपाई युवा प्रदेश उपाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, शहराध्यक्ष अक्षय कांबळे, महिला जिल्हाध्यक्ष पूजा बनसोडे, यांच्यासह पीडित कामगार उपस्थित होते.