महाबळेश्वर पालिका हददीत हॉटेल सुमनराज परीसरात भर पावसात पर्यवरणाची  हानी…

0

महाबळेश्वर: महाबळेश्वर  नगरपालिका  हद्दीतील पाचगणी  कडे जाताना  मुख्य रस्त्यापासुन काही आंतरावर वेण्णा नदी पात्रा  लगत  सर्वे  न. ७०  च्या  एकून असलेल्या  क्षेत्रा पैकी सर्व्हे  क्र . ७० / ३अ /१  बिगरशेती  केलेल्या जमीन  क्षेत्रावर  हॉटेल  सुमनराज  नावाने  प्रशस्त भले मोठे  व्यावसायीक  बांधकाम  करण्यात आले  असुन  याच  मिळकत हद्दीत काही  उच्चभृ धनिक ढोले पाटील, गङाख, वाघमोङे,  सातव, अभवानी,  सुखानी , मोरे,  इराणी, गोवडा  झेंडे  म्हात्रे. या  व  इतर अशा  काही बड्या आसामींच्या आलिशान बंगल्यांची बांधकामे  मिळकतीत असलेचे समजते.  

               याच मिळकत  हददीतील  वाघमोङे  यांच्या बंगल्याच्या शेजारी तहसील कार्यालय महाबळेश्वर  कडून शेतीच्या कारणासाठी परवानगी घेवून वृक्षराईने  व्यापलेल्या जागेमधून  जे सी बी   पोकलेन यांत्रिक  या  अजस्त्र मशिनच्या साह्याने  वृक्षराई  उखङुन मोठ्या  प्रमाणात  खोलवर जांभ्या दगडाचे खोदकाम  करुन  रस्त्याचे काम सुरु असल्याचे दिसुन येत  आहे. सदर खोदकाम  ऐन तुफानी भरपावसात पर्यावरणाची हानी करून जेसीबी पोकलेन यंत्राने नैसर्गीक हानी सुरु असताना  महाबळेश्वर  नगरपालिकेच्या वृक्षविभागाचे  वृक्ष अधिकारी हिवरे  नेमके याच कालावधीत रजेवर  गेल्याचे नगरपालीका कार्यालयातून  विचाराले असता  समजले. तसेच वृक्षविभागाचा  गस्तीवरील कर्मचारी  वलंगे  याचे कडून  देखील  अशा  खाजगी मिळकती  मधील  नैसर्गीक हानीकडे दुर्लक्ष  होत  असल्याने  पर्यावरणाचे  संरक्षणाचे कामात त्यांच्या कङुन कर्तव्यात  कसूर,कुचराई  होत  असल्याचे  प्राथमीक दर्शनी दिसून  येत  आहे.      याच सर्वे.नं. ७० च्या एकून क्षेत्रा मधील स न ७ o  / 3अ /2अ /१ मिळकत परिसरात  काही  वर्षा  पुर्वी  वृक्षतोड  करून  पर्यावरणाची  हानी करुन विकास कामासाठी जमिन साफ करुन मोकळी करण्याचा गैर प्रकार सूकांत उर्फ बाळासाहेब पांचाळ  यांनी सन  २०१७ साली  गैरप्रकार  उघडकीस आनला होता. त्या  वेळेस  सर्व्हे  नं ७० / ३अ/२अ /१ च्या  मिळकत  धारकांवर  महाबळेश्वर नगरपालिकेने  फौजदारी  न्यायालयात फौजदारी  खटला दाखल  केला होता. आता  पून्हा  त्याच मिळकत  परीसरात  तहसीलदार महाबळेश्वर कङुन शेती कामासाठी परवानगी घेवून  वृक्षराई असलेत्या जागेतून जे सी बी व पोकलेन मशीनरी ने  वृक्षराई  उखडून फांद्या  मुददेमाल  पुरावे नष्ट करून मोठया  प्रमाणात जांभ्या दगडाचे उत्खनन करून रस्ता तयार करण्यात येत असल्याचे  संदर्भात  समजून  आल्याने  पर्यावरण प्रेमी  सुर्यकांत उर्फ बाळासाहेब पांचाळ यांनी समक्ष पहाणी करुन पर्यावरणाच्या  हानीचे गांभीर्य ओळखून तहसीलदार  महाबळेश्वर  व  स्थानिक तलाठी श्री शेङोलकर तसेच मंडल आधिकारी व नगरपालिकेचे वृक्षअधिकारी यांना मोबाईल वरुन घटना स्थळाचे फोटो पाठवून व लेखी मेसेजव्दारे चार दिवसां पासून कळवले  असल्याचे बोलताना सांगीतले.

     

तलाठी शेङोलकर यांना विचारना केली असता या मिळकती  मध्ये शेतीसाठी जमिन  सपाटीकरण करण्याची परवानगी दिली असल्याचे  समोर आले  शेतीसाठी परवानगी घेवून  मिळकती  मधील  पर्यावरणाच्या हानीच्या गैरप्रकारा बाबत  शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे  गटाचे  जिल्हाध्यक्ष  श्री सचिन  मोहिते  यांनी देखील  दखल  घेवून तलाठी श्री शेडोलेकर यांचे  समक्ष संयुक्त घटना स्थळाची पाहनी करण्यात आली.

    या समक्ष पाहणीत या प्रकरणाची व्याप्ती  मोठी  गंभीर असल्याचे  निदर्शनास आले आहे. ज्या  सं न  ७०। 3 अ’ I२ अ । १  मधे शेतीच्या  सपाटी  करना च्या नावाखाली  परवानगी घेवून जे सी बी पोकलेन ने मोठ्या  प्रमाणात नैसर्गीक खोदकाम केले त्या परीसरा पासून काही अंतरावर  फॉरेस्ट  हद्दीलगत काही ठिकाणी जांभ्या  दगडाचे  कंपांउंड  वॉल  बांधकामे केल्याचे तसेच जमीनी लगत वृक्षांची तोड करून झाडांचे बुंधे निदर्शनास  येवू नये यासाठी त्यावर दगड कुजलेला पाला गवत टाकून झाकण्यात आल्याचे दिसून आले.

  तसेच काही ठिकानी पत्र्यांचे  शेड  देखील  तयार केल्याचे निदर्शनास आले.  पाहनी करताना असे दिसून येते की भविष्यात  या सव्हे क्र  ७० /३ अ / र२ /१ चे सातबाऱ्या वरील धनिक मिळकत  धारकांचे बगले विकासकामे करण्यासाठी सुनियोजीत पणे  पर्यावरणाचे  नुकसान करून कार्यक्रम सुरु असल्याचे  दिसून  येत असलेने  प्रकरणाची व्याप्ती मोठी व गंभीर  असल्याचे  दिसून आले.

     वास्तविक पाहता संपुर्ण महाबळेश्वर  तालुका भारत केंद्र सरकारने पर्यावरणाच्या संरक्षणासाठी अतिसंवेदनशिल घोषित केला असताना तसेच मा मुंबई उच्च न्यायालयाचे आदेशानुसार खाजगी वनसदृष्य .मिळकतीचे सर्व्हे चे काम सुरू असताना या मिळकतीचा देखील  सर्व्हे  करते  वेळी  वृक्षराई असल्याने  तसे नकाशात दर्शवलेले  असताना अशा वृक्षराईने व्यापलेल्या जागेत  तहसीलदार यांचे कडून शेती सपाटीकरण  करण्याची परवानगी  कशी काय दिली जाऊ शकते ? किंवा शेतीच्या कामासाठी खुदाईची परवागी  घेवून  परवानगी  घेतलेल्या  व्यक्तीकडून  मोठ्या प्रमाणात जेसीबीने व पोकलेन ने वृक्षराईचे नुकसान करून खुदाई च्या नियमांचे उल्लंघन करून  मोठ्या  प्रमाणात वृक्षराई उखङुन जांभ्या दगडांचे उत्खनन केले आहे. या संदर्भात  शिवसेना ( उबाठा )  गटाचे जिल्हा प्रमुख श्री सचिन  मोहिते यांनी  तहसीलदार  मश्वर  यांचेशी  दुरध्वनीवरून संपर्क साधून घटना स्थळावरील  वस्तुस्थीती सांगितली.

      महाबळेश्वर तालुका  केंद्रसरकारने पर्यावरण  संवेदनाशिल  क्षेत्र  म्हणुन मंजूरी  दिलेली असताना अशा घटना पर्यावरणास  घातक  ठरून  महाबळेश्वरचे पर्यावरण पर्यटन क्षेत्र नामशेष होण्याची भिती देखील  शिवसेना जिल्हाध्यक्ष श्री सचिन मोहिते  यांनी  व्यक्त  केली  आहे.                      

     सर्व्हे क्र. ७०/३अ/२अ/१ या मिळकतीत  वृक्षराई  असलेल्या  प्लॉट मधे  शेतीसाठी परवानगी घेवून जेसीबी ने जमीन उत्खनन  करून  रस्त्यासारखे कामसुरु  केले आहे त्याच परिसरात मागील  काही  महिन्यांपूर्वी  जेसीबी  ने  विनापरवाना उत्खनन केले प्रकरणी  तलाठी  शेडोलकर यांनी कारवाई  करून  जेसीबी  ट्रक्टर  वाहने जप्त  करून  कारवाई  केल्याचे  वृत्त  प्रस्तीद्ध झाले होते. व  काही लाख रुपयांची दंडात्मक कारवाई देखील मिळकत धारकावर  करण्यात आल्याचे  समजते .

 

आता  याच  मिळकत  परीसरात  शेतीसाठी जमीन सपाटी करनाची तहसील महाबळेश्वर मधून परवानगी  घेवून ऐन जुलै महिन्यात  भरपुर पावसाळी  व  दाट धुक्याच्या  वातावरनाचा  फायदा घेवून  पर्यावरना ची हानी  करून जमीन मोकळी  करून रस्ता बनविण्याचा  हेतु  दिसून येत आहे. या  विषयाची गांभिर्याने  दखल  घेवून  महाबळेश्वर नगरपालीका हददीतील वेन्ना नदी  पात्रा नजीकची मौजे क्षेत्र महाबळेश्वर स नं  ७० / ३ अ / २ अ /१  वनसदृष्य मिळकतीत शेतीच्या कामासाठी  परवानगी घेवून जेसीबी  यांत्रीक मशीनने  पर्यावरणाचे नुकसान करून सुरु  केलेले  काम सखोल  चौकशी वस्तुस्थिती पडताळनी कार्यवाही साठी स्थगीत  करून  दोषी  आढळनार्या  व्यक्तींवर कारवाईची मागणी पर्यावरण  प्रेमी  सुर्यकांत  तथा  बाळासाहेब  पांचाळ  तसेच  शिवसेना  ( उ बा  ठा ) गटाचे जिल्हाध्यक्ष  श्री सचिन मोहिते  यांनी  केली  आहे. यावेळी महाबळेश्वर शिव सेना ( उ बा ठा ) चे महाबळेश्वर  शहर प्रमुख  श्री राजाभाऊ गुजर  सातारा तालुका प्रमुख श्री . सागर रायते श्रीं हरीदास पवार  युवासेना शहरप्रमुख श्रीं आकाश  सांळुखे  विभाग प्रमुख श्री शंकर ढेबे  पत्रकार श्री . संदीप देवकुळे   श्री संजय  चोरघे  श्री राजेश  सोंडकर उपस्थीत  होते

       

             *महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील वेण्णा नदी पात्रा लगत असलेली सर्वे.क्र.70/3अ / २अ / १ वनसदृष्य  मिळकत हद्दीत  विकास कामे साधण्यासाठी  जेसीबी पोकलेन मशीनने वृक्षराई नष्टकरून जांभ्या दगडाची खुदाई करुन पर्यावरणाची हानी केली जात असलेचा गैरप्रकार निदर्शनास आला  आहे.  तसेच या मिळकत परिसरात  बिगरशेती मिळकतीत मोठ्या प्रमाणात  उचभ्रू  लोकांचे  बंगले  इमारतीं बांधकामे  अधिक केली असून या इमारत बाधकामांची  तसेच हाॅटेल सुमनराज चे केलेल्या प्रशस्त  बांधकामांची खातेनिहाय सखोल तपासणी करण्यासाठी मा.  जिल्हाधिकारी सातारा यांनी आदेश देउन तपासनी कार्यवाही करावी निदर्शनास येनार्या बेकायदेशिर बांधकाम पाडनेचे आदेश देवून  दोषींवर  देखील कारवाईची मागणी श्री सुर्यकांत उर्फ बाळासाहेब पांचाळ यांनी  केली आहे.*

     *पर्यावरणाच्या संरक्षणाच्या  दृष्टीने केंद्रसरकारने संपुर्ण महाबळेश्वर तालुका इकोसेन्सीटिव्ह झोन घोषित केला असताना या परिसरात वाढती मोठ मोठी अनाधिकृत बांधकामे त्याच बरोबर अवैध वृक्षतोङ व उत्खनन करुन पर्यावरणाची होत असलेली हानी थांबवन्यास प्रशासकीय यंत्रणा ढिलाई करत असल्याने या पुढे विविध प्रकारे होणारी पर्यावरणाची हानी शिवसेना उबाठा खपउन घेणार नाही.या पुढे शिवसेना स्टाईल ने तिव्र आंदोलन केले जाईल.असे परखङ मत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे सातारा जिल्हा प्रमुख श्री सचिन मोहिते यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here