महामेष योजना कंत्राटी कंपनी अन् अधिकाऱ्याच्या भल्यासाठीच.!

0

केडगाव :

दौंड तालुक्यातील धनगर तसेच तत्सम समाजातील लोकांनी 2022/23 या वर्षात महामेष योजनेतील अनेक उपघटकासाठी अर्ज केला होता. परंतु मागणी केलेले घटक यांना मंजुरी न देता इतर घटकांना मंजुरी दिली आहे. त्याचं लाभाचा हिस्सा भरून देखील जवळपास 10 महिने वाटप नाही? त्याअगोदरच या योजनेचे काम दिलेली कंत्राटी कंपनीचे काम संपले असे कळविले जाते. वरून पुनः वाटप करण्यात येणारे प्रशेत्र दहिवडी तालुका-माण जिल्हा सातारा येथून 2022 /23 सालचे वाटप पुणे येथून झाले असल्याचे कळविले जाते. परंतु अशा परिस्थितीत देखील काही कंत्राटी कंपनी व प्रशासकीय यंत्रणा मात्र भ्रष्टाचाराच्या महापुरात गटांगळ्या घेत असल्याचे विदारक चित्र महामेष योजनेत समोर आले आहे.

या योजनेतून दौंड तालुक्यातील जवळपास 80 ते 90 लाभार्थी यांची निवड करण्यात आली होती. यातील अनेक लाभार्थी यांनी मागणी केलेले घटक नुसार लाभ मिळाला नसल्याने लाभार्थी हिस्सा भरलेला नाही. या योजनेतील लाभ घेणे टाळले आहे. तर काहींनी लाभ भरून देखील पश्चाताप झाल्याचे बोलले जात आहे. काहींनी मागणी 4 नरमेंढे साठी केली होती. मात्र त्यांना लाभ एक नरमेंढा चा मिळाला. त्यासाठी लाभार्थी हिस्सा 2500 हजार रुपये, तो सातारा जिल्हा येथून घेण्यासाठी भाडे 7000 रुपये, वजन तफावत 564 रुपये, कागदपत्रे पंचायत समिती येथे पोहच करणे, ऑनलाइन फी, मग लाभार्थींना किती रुपयांचा लाभ की तोटा झाला. अनेक नाहक त्रास तसेच भुर्दंड लाभार्थी सहन करत आहेत. या अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न दौंड पंचायत समिती यांनी केला.

संबधित अर्जदार यांचे तफावत संबंधी पत्र व अर्ज अहवाल वर्षभरापूर्वीच महामेष मंडळ, पशुसंवर्धन विभाग येथे जमा केला आहे. मात्र भ्रष्टाचार सुरूच आहे आणि तो गतिमान करण्याचे कौशल्य प्रशासकीय यंत्रणा तसेच कंत्राटी कंपनीला लाभले आहे. म्हणजेच अधिकारी लाभार्थीच्या डोळ्यात धूळफेक करीत असताना देखील वरिष्ठ अधिकारी मात्र पाहूनही न पाहिल्यासारखे करीत आहेत. यामध्ये महामेष मंडळ गोखलेनगर येथील अधिकारी पशुसंवर्धन विभाग तर पशुसंवर्धन विभाग महामेष मंडळ अशी एकमेकांकडे तब्बल 1 वर्षभरापासून टोलवा-टोलवी करीत असल्याने नक्की ही योजना अधिकारी अन् कंत्राटी कंपनीच्या आर्थिक बळकटीसाठी सुरू आहे की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी महामेष मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शितलकुमार मुकणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आपण माहिती अधिकार नुसार अर्ज केला आहे तर मग आत्ता अपिलातच जावा.

माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये येथून माहिती मागविली असता त्यामध्ये सर्व भ्रष्टाचार उघडपणे दिसत आहे. परंतु या विषयाकडे जाणुनबुजून दुर्लक्ष केले जात असून, हा सर्व प्रकार अधिकाऱ्याची कार्यप्रणाली दर्शविणारा आहे.
– लक्ष्मीबाई सुळ – महामेष योजना, लाभार्थी -दौंड

आपण केलेल्या 2022/23 मध्ये केलेल्या अर्जानुसार लाभ घ्यावयांचा असेल तर तुम्हाला पशुसंवर्धन विभाग यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागेल. म्हणजे आपण मागणी केलेले घटक व मंजूर झालेले घटक यामधील तफावत दूर होईल .
– सचिन टेकाडे, जनमाहिती अधिकारी, महामेष मंडळ

महामेष योजनेतील आपण मागणी केलेला लाभ मिळविण्यासाठी महामेष मंडळ यांच्याकडेच माहिती घ्या. हा विषय त्यांच्याकडील आहे अन् त्यांनी तफावत दूर होण्यासंबंधी आमच्याकडे अर्ज करावयास सांगितला असेल तर आपण पाठवू शकता आम्ही पुन्हा त्याच्याकडे पाठवू कारण हा विषय त्यांच्याकडील आहे .
– डॉ. परिहार – उपआयुक्त, पशुंवर्धन विभाग -पुणे 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here