महायज्ञ, देवदेवता जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्याचे महंत रामगिरी महाराज यांचे आवाहन

0

संगमनेर : योगीराज श्री गंगागिरी महाराज यांच्या १२० व्या पुण्यतिथीनिमित्त सराला बेट येथे मंदिर जीर्णोद्धार,  विविध देवदेवताचा प्राणप्रतिष्ठा आणि श्री हरिहर महायज्ञ सोहळ्याचे आयोजन केले असून या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा असे निमंत्रण सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी रहिमपूरकरांना दिले.

        रहिमपूर तालुका संगमनेर येथील हनुमान मंदिरात बुधवारी सायंकाळी झालेल्या नियोजन बैठकीत महंत रामगिरी महाराज बोलत होते. यावेळी ते म्हणाले की दिनांक १६ डिसेंबर ते २३ डिसेंबर या कालावधीत योगीराज सदगुरू श्री गंगागिरी महाराज यांची १२० पुण्यतिथी व मंदिर जीर्णोद्धार पूर्वक विविध देव देवताचा प्राणप्रतिष्ठा व सामान्य जनतेच्या अडीअडचणी दूर होण्यासाठी त्यांच्या कल्याणार्थ श्री हरिहर महायज्ञ होत असून या सोहळ्यासाठी जवळपास वीस लाख भाविक सराला बेटावर येणार आहेत. त्यासाठी सर्व भाविकांनी सढळ हाताने मदत करून या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील महंत रामगिरी महाराज यांनी केले आहे. दरम्यान ब्रह्मलीन सदगुरू गुरुवर्य नारायणगिरीजी महाराज यांनी २००९ ला सरला बेट येथील सर्व मंदिर पाडून या मंदिरांचा जिर्णोद्धार सुरू केला होता. दरम्यानच्या काळात नारायणगिरी महाराजांचे महानिर्वाण झाल्यावर ती जबाबदारी आपल्यावर आली. त्यानंतर सुमारे १५ कोटी रुपये खर्च करून येथील जीर्णोद्धाराचे काम पूर्णत्वास गेले आहे. सराला बेटावर योगीराज गंगागिरी महाराज यांनी साधना, भजन, कीर्तन नामस्मरण केले आहे. बेटावरील सर्व मंदिरे सराला बेटाचे तत्कालीन महंत गुरुवर्य हरीगिरी महाराज यांच्या काळातील होते. त्यानंतर नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, नारायणगिरी महाराज अशा दोन-तीन पिढ्या गेलेल्या असल्याने त्या मंदिरांचा जिर्णोद्धार होणे गरजेचे होते. म्हणून नारायणगिरी महाराज यांनी जुने मंदिरे पाडून नवीन मंदिरे बांधकाम पूर्ण करून जीर्णोद्धार केला होता. यावेळी रहिमपूर ग्रामस्थांनी आपापल्या परीने देणगीची घोषणा केली. यावेळी रहिमपूर भजनी मंडळासह ग्रामंस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here