महाराष्ट्रातील लोककलावंतांसाठी आनंदाची बातमी मिळणार !

0

सातारा/अनिल वीर : महाराष्ट्र राज्यातील तमाम वृद्ध कलावंत व साहित्यिकांच्या मानधन वाढीचा प्रश्न नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात सुटणार आहे. सुप्रसिद्ध गायक विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वात मंगळवार दि. २५ जुलै २०२३ रोजी मुंबईतील आझाद मैदानावर व महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर एकाच दिवशी कलावंतांनी भव्य आंदोलन केले होते. त्याच दिवशी विष्णू शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करुन कलावंतांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात येईल. असे आश्वासन सांस्कृतिक मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते.

पुढे या विषयाचा सातत्यपूर्वक पाठपुरावा करीत असताना गुरुवार दि. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची त्यांच्या मंत्रालयातील कार्यालयात भेट घेतली असता अजितदादांनी त्वरित सांस्कृतिक मंत्र्यांशी संपर्क साधून वृद्ध कलावंतांच्या मानधन वाढीचा प्रश्न त्वरित सोडविण्याच्या सूचना दिल्या.  अर्थमंत्री या नात्याने या विषयासाठी निधी कमी पडू देणार नाही. असेही दादांनी आश्वाशीत केले होते. तसेच कलावंतांच्या सर्व मागण्या सोडविण्यासाठी बैठक आयोजित करण्यास त्वरीत सांगितले आहे. त्यानुसार बुधवार दि. २९ नोव्हेंबर २०२३ रोजी  मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचे सचिव विकास खारगे , सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभिषण चवरे, उपसंचालक श्रीराम पांडे, उपसचिव नंदा राऊत,अप्पर सचिव बाळासाहेब सावंत,गायक विष्णू शिंदे, शाहीर रामलिंग जाधव, गायक कमलेश शेजुळे, गायक हर्षद कांबळे आदींच्या उपस्थितीत मंत्रालयात महत्वाची बैठक पार पडली.त्यामुळे मानधन वाढीची प्रक्रिया सुरु करण्यात आली. ज्याची अधिकृत घोषणा  नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात   होण्याची शक्यता आहे.असा आशावाद लोककलावंत सांस्कृतिक मंचने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here