उरण २४ (विठ्ठल ममताबादे )महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियन ही संघटना मच्छीमारांच्या न्याय हक्कासाठी व त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी स्थापन झाली आहे.या संघटनेच्या मुख्य कार्यालयाचे उरण तालुक्यातील हनुमान कोळीवाडा गावात उद्घाटन झाले. ही सर्वांसाठी आनंदाची बाब आहे.ही संघटना मच्छीमारांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध असून जास्तीत जास्त मच्छीमार बांधवांनी या संघटनेचे सभासदत्व स्वीकारावे व मच्छीमारांवर झालेल्या अन्याया विरोधात या संघटनेच्या छत्रछायेखाली एकत्र या. असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार पवार यांनी हनुमान कोळीवाडा येथे केले.
हनुमान कोळीवाडा गावात मच्छिमार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते रमेश कोळी यांनी स्वतःचे घर महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स यूनियनच्या मुख्य कार्यालयाकरीता दिले.जागा उपलब्ध करून दिली. या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी नंदकुमार पवार यांनी उपस्थित नागरीकांना, कोळी बांधवांना मार्गदर्शन केले.कोणत्याही नेत्याच्या आमिषाला बळी पडू नका. समाजात संघटनेत फूट पाडण्याचे काम काही नेते राजकीय, पक्ष करीत आहेत. तुम्ही मात्र कोणाला बळी पडू नका. असेच नेहमी एकत्र रहा. आपली एकी हीच आपली ताकद आाहे. संघटनेच्या माध्यमातून मच्छीमारांचे सर्व हक्क व अधिकार त्यांना मिळवून देऊ.त्यासाठी आपले सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे यावेळी नंदकुमार पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी रमेश कोळी, उपाध्यक्ष हितेश कोळी, मच्छिमार सोसायटी गव्हाणचे सेक्रेटरी कृष्णा कोळी, ग्रामसुधारणा मंडळ शेवा कोळीवाडाचे अध्यक्ष सुरेश कोळी, हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायतचे सरपंच परमानंद कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यासपीठावर उपस्थित असलेले मच्छिमारांचे नेते रमेश कोळी यांनी पोलिस प्रशासन,जेएनपीटी प्रशासन,महाराष्ट्र प्रशासन गोरगरिब कोळी बांधवांवर कसा अन्याय करते याचा पाढाच वाचला.महाराष्ट्र शासनाने तसेच जेएनपीटी प्रशासनाने ३८ वर्षे शेवा गावातील नागरिकांना, ग्रामस्थांना पुनर्वसना वंचित ठेवले.गावातील ग्रामस्थांवर ३८ वर्षाहून जास्त अत्याचार केले अशा जेएनपीटी (जेएनपीए)प्रशासनावर व संबंधित अधिकाऱ्यांवर पोलीस प्रशासन गुन्हे का नोंदवत नाही.सर्वसामान्य कोळी बांधवांवर प्रत्येक वेळी गुन्हे का नोंदविले जातात ? स्वतःच्या न्याय हक्कासाठी लढणे गुन्हा आहे का ? आम्हाला स्वतःची मालकी हक्क असलेली जमीन नको का ? आमचे पुनर्वसन कधी करणार ? आमच्याच जमिनी घेउन आमच्यावरच पोलीस प्रशासना तर्फे गुन्हे नोंदविले जातात. यात ग्रामस्थांची काय चूक ? प्रशासन सर्वसामान्य जनतेला, कोळी बांधवांना का दोषी ठरवत आहे ? असा सवाल उपस्थित केला. शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थांनी पुनवर्सन व इतर समस्यांसाठी एक व्हा.आम्ही तुमच्या सोबत आहोत असे आवाहन रमेश कोळी यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र स्मॉल स्केल ट्रॅडिशनल फिश वर्कर्स यूनियन ही मच्छीमारांची भारतातील पहिली संघटना आहे. आणि ती उरण मध्ये हनुमान कोळी येथे स्थापन झाली आहे.त्यामूळे या संघटनेकडे न्याय मागण्यासाठी अनेक कोळी बांधव, मच्छिमार बांधव जात आहेत.हनुमान कोळीवाडा गावात कार्यालय उदघाटन प्रसंगी गावातील ग्रामस्थ, नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.