उरण दि ९(विठ्ठल ममताबादे)स्त्री म्हणजे प्रेरणा तिच्या कष्टांनी घर उजळते, तिच्या स्वप्नांनी जग बदलले,तिच्या हसर्या चेहर्याने सुख मिळते,तिच्या अस्तित्वाने सृष्टी सजते !…
दर वर्षी ८ मार्च हा दिवस जगभरात “जागतिक महिला दिन” म्हणून उत्साहात साजरा केला जातो.स्त्री सक्षमीकरण आणि महिलां भगिनींच्या सर्वांगीण विकासा करिता अनेक योजनांच्या माध्यमातून आपलं दायित्व जपणारी आणि आपल्या धडाकेबाज विकास कामांचा माध्यामातून अल्पावधीतच आदर्श ग्रामपंचायत म्हणून नावारूपाला आलेली पनवेल तालुक्यातील दूंदरे ग्रुप ग्रामपंचायत यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधत श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालय रिटघर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भैरवदेव विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रुप ग्रामपंचायत दूंदरेचे कार्यक्षम सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य सोबतच सर्व महिलां भगिनीं व रॉबिनहुड आर्मी आणि नमस्ते योगा क्लासेस या सर्व मान्यवर मंडळींचे लेझीम पथकाच्या गजरात भव्य असं स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवातीला दूंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच सुभाषशेठ भोपी,रॉबिनहुड आर्मी,नमस्ते योगा क्लासेसचे सर्व सदस्य व विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंखे सर सर्व शिक्षकवृंद यांनी राजमाता जिजाऊ,सावित्रीबाई फुले,लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली.त्यानंतर रॉबिन हुड सेवाभावी संस्थे मार्फत नमस्ते योगा क्लासेसच्या वतीने मुलींकरिता जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत योगा,प्राणायाम,योगिकनृत्य सादर करून घेतले तर ग्रुप ग्रामपंचायत दूंदरे आणि रॉबिन हूड सेवा भावी संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.तर ग्रुप ग्रामपंचायत दूंदरेचे कार्यक्षम सरपंच सुभाषशेठ भोपी यांच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमा दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमा अंतर्गत दूंदरे ग्रामपंचायत हद्दीतील पी.एम. जनमन व पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांचे भूमिपूजन व बांधकाम सुरू असलेल्या घरांची पाहणी देखील करण्यात आली.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भैरवदेव विद्यालयात आयोजित कार्यक्रमा करिता दूंदरे ग्रुप ग्रामपंचायतीचे कर्तव्यदक्ष सरपंच सुभाषशेठ भोपी, जिल्हा कृषी अधिकारी खेडेकर सर पवनकुमार नजन , अंगणवाडी पर्यवेक्षीका ज्योती गांधी मॅडम, नमस्ते योगा संस्थेच्या संस्थापक आमिषा शहा मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.दूंदरे ग्रामपंचायतीचे सदस्य शांताराम चौधरी, भैरवदेव विद्यालयाचे मुख्याध्यापक साळुंखे सर व सर्व शिक्षक वृंद विद्यार्थी वर्ग, अंगणवाडी सेविका या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माळी मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित पाटील यांनी आपल्या ओघवत्या भाषा शैलीत केली. अशा प्रकारे हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.