मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करा – कास्ट्राईब व अध्यापकभारतीची मागणी

0

येवला (प्रतिनिधी)

महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या सर्व विभागातील मागासवर्गीय शासकीय कर्मचारी यांना व भविष्यात केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय सेवेत येऊ इच्छिणाऱ्या सर्व प्रकारच्या मागासवर्गातल्या उमेदवारांना शासकीय सेवे देण्याचे मार्गच शासनाच्या आरक्षण विरोधी धोरणामुळे बंद करण्याचा घाट सरकार स्तरावरून होत आहे. गेल्या तीन वर्षापासून शासकीय मागासवर्गीय कर्मचारी यांना पदोन्नतीतील आरक्षण डावले गेले असल्यामुळे हा सर्व प्रकारच्या मागासवर्गीय कर्मचारी यांच्यावर होणारा अन्याय असून महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागासह सर्व शासकीय विभागात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावी अशी मागणी आज येथे कास्ट्राईब शिक्षक संघटना येवला शाखा व राष्ट्रीय बालक विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षण प्रशिक्षण संस्था अध्यापक भारती यांच्यावतीने येवला तहसीलदार आबा महाजन यांना दिलेल्या निवेदनात मार्फत महाराष्ट्र व केंद्र सरकारला केली आहे.

     

शासकीय सेवेत मागासवर्गीय  समाज घटजावर सातत्याने अन्याय झाला असून शैक्षणिक संस्थांनीतर मागासवर्ग प्रवर्गात योग्य उमेदवार मिळत नसल्याची व विद्यार्थी नुकसान होत आहे ह्या सबबी खाली मोठ्या प्रमाणावर खुल्या प्रवर्गातील उमेदवार सरकारी सेवेत घेतले गेले व अधिकार पदाच्या जागी बसवले गेले आहेत हा मागासवर्गीय घटकांवर अन्याय केला गेला असून जे मागासवर्गीय लोक कर्मचारी म्हणून शासकीय सेवेतच स्वातंत्र्याच्या सत्त्यातर  वर्षानंतरही रोस्टर प्रमाणे सेवेत आले नाहीत मग ते शासकीय सेवेतील पदोन्नती साठी पात्र कधी ठराविक असा सवाल अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ यांनी शासनास केला आहे.

 *प्रमुख मागण्या :

१) महाराष्ट्र राज्यातील शिक्षण विभागासह सर्व शासकीय विभागात मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील आरक्षण तात्काळ लागू करावे.

२) शालेय शैक्षणिक उपक्रमांची संख्या कमी करण्यात यावी.

३) शाळा उघडल्या पासून शैक्षणिक उपक्रमांच संख्या कमी करण्यात यावी.

( उपक्रम ऑनलाईन करणे, ऑनलाईन माहिती देणे यातच वेळ जास्त जाऊन विद्यार्थी हिताकडे/अध्यापणाकडे दुर्लक्ष होत असल्याने उपक्रमांची संख्या कमी करावी.)

४) प्राथमिक शाळेत तात्पुरती शिक्षक भरती न करता कायमस्वरूपी शिक्षक भरती करण्यात यावी.

५) अनुसूचित जाती व जमातीचे उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीत करण्यात येऊ नये.

६) जातनिहाय जनगणना तात्काळ करण्यात यावी.

याप्रसंगी कास्ट्राईब शिक्षक संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष गोकुळ वाघ,अध्यापकभारतीचे संस्थापक शरद शेजवळ,शैलेंद्र वाघ,विनोद सोनवणे,बाबासाहेब गोविंद,आरक्षण कृती समितीचे अँड.विजय निरभवणे,इस्तू संघटनेचे रोहित गांगुर्डे,भारत बर्वे,जगताप,शरद अहिरे,छगन पवार,सोमनाथ खळे,बाबासाहेब धिवर,अण्णासाहेब पवार,बाबासाहेब भालेराव,दिनकर दुनबळे,राजरत्न वाहुळ आदी पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here