जामखेड तालुका प्रतिनिधी
जामखेड येथील सागर अंदुरे कुटूंबियांना खंडणी व मारहाण प्रकरणी पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवान मुरूमकर यांच्या सह एकुण आठ जणांवर खुनाचा प्रयत्न करणे गुन्हा दाखल झाला आणखी दोन कलमांची वाढ झाली असून कलम ३०७, ३२६ नुसार खुनाचा प्रयत्न करणे हे गंभीर कलम लागल्याने आरोपी मुरूमकर व सहकाऱ्यांच्या अडचणी वाढ झालीआहे.
या बाबत सविस्तर असे की, जामखेड येथील प्रसिध्द व्यापारी अंदुरे कुटूंबाकडे ५० लाखांची खंडणी मागत सतत धमकावणे व मारहाण केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला डॉ. भगवान मुरूमकर यांचेसह ८ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणामुळे जामखेडच्या राजकिय व व्यापारी वर्गात खळबळ उडाली होती.
या घटनेतील फिर्यादी सागर अंदुरे व दोन नातेवाईक या मारहाणीत गंभीर जखमी झाले होते. त्या मुळे त्यांच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. याबाबत जखमींच्या मेडिकल अहवाला नुसार पुन्हा या गुन्ह्यात खुनाचा प्रयत्न करणे हे वाढीव कलम लावण्यात आले आहे असल्याची माहिती या गुन्हाचे तपास अधिकारी जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात यांनी दिली आहे.
पंचायत समितीचे माजी सभापती व सदस्य डॉ. भगवान मुरुमकर यांच्या सह आठ जणांविरोधात कलम ३८७ अन्वये सह खुनाचा प्रयत्न करणे (३०७), व (३२६) हे वाढीव कलमान्वये जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याने जामखेड तालुक्यातील राजकीय व व्यवसाईक क्षेत्रात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करत आहेत.