माझा गावं माझा अभिमान या अभियाना अंतर्गत  “आम्ही खारसापोलीकर ” नामफलकाचा अनावरण सोहळा उत्साहात संपन्न !

0

उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) ” माझा गाव माझा अभिमान !” ही संकल्पना उराशी बाळगत आज पर्यंत उरण,पनवेल, पेण तालुक्यातील अनेक गावांना त्यांच्या गावांच्या नावांचे नामफलक( बोधचिन्ह )अर्थात  विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नावांचे नवीन नामफलक बनवून देण्याचं औदार्य ज्यांच्या मनाच्या मोठेपणातून साकारलं गेलं असे दानशूर व्यक्तिमत्त्व केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या संकल्परुपी औदार्यातून हमरापुर – पेण विभागातील खारसापोली गावात आम्ही खारसापोलीकर या  नावाचं  विद्युत रोषणाईने चमकणारे नूतन नामफलक ( बोधचिन्ह ) बनऊन देण्यात आले.ते हमरापुर ,वरेडीरोड – पेण  रस्त्याच्या खारसापोली गावाच्या अगदी नाक्यावर  बसविण्यात आलेल्या ह्या नूतन नामफलकाचा अनावरण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन  खारसापोली गावचे माजी सरपंच प्रविणजी म्हात्रे आणि ग्रामस्थांच्या  आयोजनातून आणि राजू मुंबईकर यांच्या औदार्यातून करण्यात आले होते.

.खारसापोली गावचे  माजी सरपंच प्रविण  म्हात्रे यांच्या शब्दाला  मान देतं खारसापोली गावांकरिता विद्युत रोषणाईने चमकणारे आम्ही खारसापोलीकर नावाचं नामफलक ( बोधचिन्ह )बनवून देण्यात आले. आणि ह्या कार्यक्रमाचे आयोजन अगदी उत्स्फूर्तपणे  करण्यात आले. कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवरांचे स्वागत खारसापोली गावातील ग्रामस्थांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने केले.आणि ह्या कार्यक्रमा करिता उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवर मंडळींचे महिला भगिनीनी प्रथमतः औक्षण करत जोरदार स्वागत करत सर्वांना शाल, श्रीफळ ,पुष्पगुच्छ देऊन  यथोचित मान – सन्मान करून सर्वांना सन्मानित करण्यात आले.

पेण हमारापुर येथील  खारसापोली ह्या गावांत नवीन नामफलकाच्या ( बोधचिन्हाच्या) अनावरण सोहळ्या प्रसंगी केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर, चिर्ले  ग्रामपंचायतीचे सदस्य राजेश पाटील,वेश्वि गावचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयंत कडू ,विनोददादा पाटील ( सामाजिक कार्यकर्ते वेश्वि ),अनिल घरत ( उरण तालुका सचिव – आगरी, कोळी, कराडी संघर्ष सामाजिक संस्था ), कासूमोराचे सामाजिक कार्यकर्ते अरविंद पाटील,गोल्डन ज्युबली मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष देवीदास पाटील,नितेश मुंबईकर आणि  माजी सरपंच प्रविण म्हात्रे,खारसापोलीचे पोलिस पाटील मिलिंद पाटील,सुरेन्द्रजी म्हात्रे,मनसे पेण शहर अध्यक्ष नितीन पाटील,मनसे विभाग अध्यक्ष रोहितजी पाटील,सुभाष म्हात्रे,पंकज म्हात्रे आणि खारसापोली गावांतील ग्रामस्थ , युवा आणि महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.यां सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ह्या विद्युत रोषणाईने चमकणाऱ्या नवीन नामफलकाचा अनावरण कार्यक्रम सोहळा मोठ्या उत्साहात आणि उत्तम प्रतिसादात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here