मातंग साहित्य परिषद २०२५ च्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार जाहिर

0

 पुणे प्रतिनिधी :

           प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या मातंग साहित्य परिषदेच्या २०२५ च्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय वाड्मय पुरस्कार जाहिर  करण्यात आले आहेत.महाराष्ट्रातून व देशातून पुरस्कारासाठी ग्रंथ मागविण्यात येत त्यातील  मराठी इंग्रजी हिंदी या भाषेतील उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीला  मातंग साहित्य परिषदेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो.

महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथील भारतीय विचार साधनीचे सभागृह , महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची इमारतीत, भावी शाळेच्या पाठीमागे, टिळक रोड,सदाशिव पेठ, पुणे येथे रविवार, दि.13एप्रिल 2025 रोजी सकाळी 11.00वा. पद्मश्री गिरीजी प्रभुणे यांच्या अध्यक्षतेखाली व राज्यसभेचे मा.सदस्य विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे याप्रसंगी   मा मुकुंदराव कुलकर्णी,माजी मंत्री दिलीप कांबळे,आमदार अमित गोरखे,विलास लांडगे,शरद शिंदे,नरेंद्र पेंडसे,सचिनची भोसले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे.अशी माहिती मातंग साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ धनंजय भिसे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here