माफसु येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन

0

नागपूर : आज दि. 06.12.2024 रोजी कास्ट्राईब महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कर्मचारी संघटना (नागपूर शाखा) तर्फे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाण दिनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांच्या हस्ते भारतरत्न परमपुज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती तैलचित्राला पुष्पहार घालून व संचालनालय, विस्तार शिक्षण, शेतकरी भवन, तेलंखेडी येथील प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी डॉ. शिरीष उपाध्ये (संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता पशु विज्ञान), डॉ. नितीन कुरकुरे (संचालक संशोधन), डॉ. अनिल भिकाने (संचालक विस्तार शिक्षण), डॉ. सचिन बोन्डे (अधिष्ठाता निम्न शिक्षण), डॉ. मुकुंद आमले (अधिष्ठाता मत्स्य विज्ञान), श्रीमती. मोना ठाकूर (कुलसचिव), श्रीमती. मनीषा शेंडे (नियंत्रक वित्त), अरिफ शेख (विद्यापीठ अभियंता), सुनील गावंडे (विद्यापीठ ग्रंथपाल), डॉ. भूषण रामटेके (परीक्षा नियंत्रक), डॉ. अजय गावंडे (उपकुलसचिव आस्थापना), डॉ. जितेंद्र वाघाये (उपकुलसचिव शिक्षण), तांत्रिक अधिकारी डॉ. अतुल ढोक, डॉ. संजय गोडबोले, डॉ. सारीपुत्त लांडगे, डॉ. विजय बासुनाथे, डॉ. प्रज्ञेय ताकसांडे, तांत्रिक अधिकारी व अध्यक्ष, कास्ट्राईब महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कर्मचारी संघटना (नागपूर शाखा), डॉ. गीतांजली ढुमे, प्रवीण बागडे, उपाध्यक्ष, कास्ट्राईब महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कर्मचारी संघटना (नागपूर शाखा) व मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here