पैठण,दिं.१५:कोल्हापूर येथील मराठी बालकुमार साहित्य सभा यांच्यावतीने २०२२ चा अत्यंत प्रतिष्ठेचा बालसाहित्य पुरस्कार यंदा अय्युब पठाण लोहगांवकर यांच्या दर्जेदार बालकविता संग्रह, ” मायबाप ” या बालकविता संग्रहाला जाहीर झाले आहे. असे आयोजक डॉ. श्रीकांत पाटील कोल्हापूर यांनी अय्युब पठाण यांना कळविले आहे. या पुरस्काराचे स्वरूप स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम असे असून लवकरच कोल्हापूर येथे या पुस्स्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ” मायबाप, ” हा अय्युब पठाण यांचा हा सातवा बालकवितासंग्रह आहे.कवी अय्युब पठाण लोहगांवकर हे बालभारती पाठयपुस्तकातील प्रसिद्ध कवी आहे.