मारकडवाडीत पोलिसांनी कारवाईचा फास आवळला.

0

आमदार उत्तम जानकरांसह अनेक ग्रामस्थांवर गुन्हे दाखल

सोलापूर : मुंबईमध्ये एकीकडे महायुती सरकारचा शपथविधी काही तासांमध्ये पार पडणार आहे. पण दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या निकालावरून सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात बॅलेट पेपर मतदान प्रकरणी अजूनही गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरूच आहे.
शरदचंद्र पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्याविरोधात आता गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

माळशिरच्या मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकरांवर गुन्हा दाखल केला आहे. आमदार जानकरांसह शेकडो ग्रामस्थांविरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. मारकडवाडी प्रकरणात पोलिसांकडून आतापर्यंत दोन गुन्हे दाखल आहे. मतदान प्रक्रियेसाठी पुढाकार घेणाऱ्या मारकडवाडीतील 17 जणांसह अन्य 100 ते 200 ग्रामस्थांच्या विरोधात मंळवारी संध्याकाळीच गुन्हे दाखल झाले होते.

तर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आमदार उत्तमराव जानकारांसह 89 अज्ञात आणि 100 ते 200 इतर आरोपींवर गुन्हे दाखल केले आहे. आमदार उत्तमराव जानकर आणि ग्रामस्थांवर बीएनएस 189 (1), (2), 190, 223 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम 135 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. माळशिरसच्या नातेपुते पोलीस ठाण्यात सर्व आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवले आहे.

मारकडवाडीकरांनी डमी ईव्हीएम मशीनला सलाईन लावून केलं प्रतिकात्मक आंदोलन

दरम्यान, मंगळवारी माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाने बॅलेट पेपरवर गावात फेरमतदान घेण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाने हस्तक्षेप करून मतदान थांबवण्यात आलं होतं. पण गावकऱ्यांनी या मतदानापासून माघार जरूर घेतली परंतु प्रशासनाने केलेल्या दबावामुळे याची चर्चा राज्यभर झाली आता याच्याच प्रतिक्रिया उमटत आहेत.

याचाच भाग म्हणून बुधवारी पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथील काही गावकऱ्यांनी आणि मतदारांनी एकत्र येत डमी ईव्हीएम मशीनला सलाईन लावत एकप्रकारे प्रतिकात्मक आंदोलन केलं, असं आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here