मुंबई : मुंबई विमानतळाच्या धावपट्टीवर एका खासगी विमानाला अपघात झाला. त्यामुळे विमानतळाचा रन वे काहीकाळ पूर्णपणे बंद पडला होता. परिणामी मुंबई विमानतळावरची वाहतूक काही काळासाठी बंद पडली होती. काही विमानं इतरत्र वळवण्यात आली होती, पण आता धावपट्टी सुरू झालीय आणि हळूहळू वाहतूक पूर्वपदावर येत आहे.तातडीनं बचावकार्य हाती घेऊन रनवे क्विअर करण्यात आला आहे. विशाखापट्टणम ते मुंबईला येणारं हे विमान होतं.
हे विमान मुंबई विमानतळावर लँड होताना धावपट्टीवर कोसळलं आणि त्यानंतर धावपट्टी सोडून बाहेर गेलं, असं डीजीसीएच्या सूत्रांनी सांगितलं आहे. “हा अपघात एवढा भीषण होता की विमानाचे जागीच 2 तुकडे झाले. त्यामुळे विमानचे दोन्ही पंख तुटले. त्यातून इंधनाची गळती सुरू झाली आणि परिणामी आग लागली. पण बचाव पथकानं तात्काळ तिथं धाव घेऊन आग विझवली आणि सर्व प्रवाशांना सुखरूप वाचवलं आहे,” अशी माहिती डीजीसीएच्या सुत्रांनी दिली .
विमानाची तिन्ही चाकं तुटली आहेत. तसंच विमानातली वातानुकुलित यंत्रणा पूर्णपणे निकामी झाली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याची सध्या चौकशी सुरू आहे. लवकरच अपघाताचं कारण पुढे येईल असंही सांगण्यात आलं आहे.
Learjet 45 aircraft VT-DBL नावाचं ते एक प्रायव्हेट जेट होतं. विमानात सहा प्रवासी आणि दोन क्रू मेंबर होते. मुसळधार पावसामुळे फक्त 700 मी अंतरावरच दिसत होतं. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
या अपघातानंतर डेहराडून ते मुंबई UK 865 हे विमान गोव्याकडे वळवण्यात आलं होतं. तसंच विस्तारा विमानतळाची दोन विमानं बंगळुरूकडे वळवण्यात आली होती.
“अतिशय मुसळधार पाऊस होता. मी माझ्या उड्डाण अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांच्याकडे पाहा. ते रनवेला समांतर धावत होते. 10 सेकंदांनंतर ATC वाले क्रॅश क्रॅश असं ओरडायला लागले,” असं तरुण शुक्ला या वैमानिकाने सांगितलं या अपघातानंतर डेहराडून ते मुंबई UK 865 हे विमान गोव्याकडे वळवण्यात आलं होतं. तसंच विस्ताराची दोन विमानं बंगळुरूकडे वळवण्यात आली होती. तसंच पाच विमानं सुरतकडे वळवण्यात आली होती.