येवला (प्रतिनिधी)
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मानवाच्या आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक मुक्तीचा मार्ग ८९ वर्षांपूर्वी येवला येथे मुंबई इलाखा दलित वर्ग परिषदेत उदघोषित करून मुक्ती कोण पथे ? ह्या ऐतिहासिक भूमिकेतून सुनिश्चित करून तथागताचा सदधम्म स्वीकारला,त्याचा पाया येवल्याच्या भूमी ठरली.त्याच मुक्तिभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्थेच्या पुढाकाराने संडे धम्म स्कुल चळवळ चालविणे हि येथील तमाम बौद्ध धर्मीय व सामाजिक, शैक्षणिक,धम्म चळवळीत कार्य करणाऱ्याची नैतिक जबाबदारी असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या व संडे धम्म स्कुलच्या प्रशिक्षिका राजश्री त्रिभुवन यांनी व्यक्त केले. ऐतिहासिक मुक्तिभूमी येथे संडे धम्म स्कुल उपक्रम सुरू करण्यात आला त्याच्या उदघाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्रिभुवन बोलत होत्या.
धम्म संस्कार प्रचार-प्रसार प्रबोधन समिती,नाशिक व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक संस्था नाशिक यांच्या वतीने बालक-बालिका,युवक-युवतींना मानवी जीवनमूल्य,धम्म संस्कार बाल वयापासून होण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील अनेक बौद्ध संस्कार केंद्रे,बुद्धविहारे ह्या ठिकाणी संडे धम्म स्कुल चालविले जात असून काळाची गरज लक्षात घेऊन दर रविवारी आपल्या संपर्कातील व्यक्ती, घर-कुटुंबातील वय वर्षे पाचे ते सतरा ह्या वयोगतील बाल-युवाना दर रविवारी येवला मुक्तिभूमी येथे सकाळी ९:३० ते १०:३० वा.मानवतावादी संत,सुधारक महापुरुष,महामाता यांच्या जीवन कार्याच्या माहिती सोबत तथागत गौतम बुद्ध यांच्या धम्म कार्य-संस्कार विचार,तत्व,मूल्यांची ओळख,त्रिसरण,पंचशीला सह बौद्ध धम्म संस्कार विधी,गाथा यांचा परिचय करून देऊन संविधानिक मूल्यांचा ओळख प्रशिक्षित शिक्षक-शिक्षिका संडे धम्म स्कुल च्या सामाजिक,विधायक कार्यास येवला शहर व तालुक्यातील जनतेने आपल्या लहान बालकांसह सहभाग नोंदवावा असे आवाहन संडे धम्म स्कुल उवक्रमाचे संयोजक एस.डी.शेजवळ सर यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात केले.
बौद्धचार्य अभिमन्यू शिरसाठ यांनी ह्यावेळी उपस्थितांना त्रिशरण, पंचशील दिले. सामाजिक कार्यकर्ते सुरेश खळे,गजानन सुर्यकर,विनोद त्रिभुवन,अनिल घोडेराव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संकेत गरुड, विद्या त्रिभुवन, प्रणव गरुड, विधान त्रिभुवन,नयन सुर्यकर,नेत्रा सुर्यकर,अश्विन खळे, त्रिशांत खळे,अभिज्ञा खळे हे बाळ धम्म उपासक,उपसिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक गजानन सुर्यकर,आभार राजरत्न वाहुळ यांनी मानले.