येवला प्रतिनिधी :
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची ऐतिहासिक प्रेरणास्थळे ही क्रांतीचे केंद्र असून लाखो अनुयायी बाबासाहेबांच्या क्रांतिकार्याने चैत्यमान झालेल्या क्षेत्रातून ठिकाणाहून कोट्यावधी रुपयाचे ग्रंथ सातत्याने खरेदी करतात व त्याचे वाचन करून महापुरुषांच्या विचाराचे आचरण करण्याचा प्रयत्न करतात असे मत जयश्री खरे यांनी काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक परिवर्तन प्रबोधन व सुधारणावादी लढे ज्या ज्या ठिकाणी लढले ते महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह, नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, येवल्याच्या ऐतिहासिक
मुक्तिभूमी,धम्म दीक्षाभूमी नागपूर,चैत्यभूमी दादर मुंबई ह्या ठिकाणी येणारे तथागत बुद्ध संत कबीर,संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज तथा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक अनुयायी मौल्यवान ग्रंथ खरेदी करून ते स्वतःवर संस्कार करून घेण्यासाठी ते ग्रंथ घरी जाताना डोक्यावर ग्रंथ घेऊन जातात ते डोक्यात घेण्यासाठी असे उद्गार येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या तथा व्याख्या त्या प्रा.जयश्री खरे यांनी काढले.
ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या 89 व्या वर्धापन दिनाच्या उच्च साधून त्यांनी येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी सार्वजनिक वाचनालय तथा राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्ती भूमी अभ्यासिका यास मौल्यवान ग्रंथ साहित्य दान केले त्यावेळी त्या बोलत होत्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुक्ती भूमी सार्वजनिक वाचनालय तथा मुक्ती भूमी अभ्यासिकेचे संस्थापक शरद शेजवळ यांनी केले. या वेळेला येवला मर्चंट बँकेचे संचालक सुभाष गांगुर्डे मुक्ती प्रतिष्ठानचे सदस्य गुड्डू भाऊ जावळे मंगेश शिंदे वाय डी लोखंडे श्याम पगारे सुनील निकाळे सुप्रसिद्ध कवी गायक सुनील खरे विमलबाई शेजवळ डॉदीक्षा शेजवळ वर्षा शेजवळ गायक जितेंद्र शेजाळ गायिका दीक्षा गौरी विजय भोंडगे सिद्धार्थ गुंजाळ राहुल सोनवणे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार दत्तू वाघ यांनी मानले.